34 C
Mumbai
Wednesday, October 27, 2021
घरविशेषबसच्या लोकेशनची यंत्रणा तर बसविली, पण अ‍ॅप सुरूच नाही!

बसच्या लोकेशनची यंत्रणा तर बसविली, पण अ‍ॅप सुरूच नाही!

Related

एसटी बसविषयीची माहिती थेट प्रवाशांना मिळावी यासाठी एसटी महामंडळाने सर्व बसमध्ये ‘व्हीटीएस’ यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला. या यंत्रणेच्या मदतीने बस कुठे पोहचली, किती वेळाने पोहोचेल, कुठे थांबली आहे याची त्याच क्षणाची माहिती प्रवाशांना मिळणार आहे. मुंबई विभागातील ३४९ गाड्यांवर ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. पाच आगारातील बसस्थानकात डिस्प्ले बोर्ड बसविण्यात आले आहेत. पण ज्या अ‍ॅपवरून ही माहिती मिळणार आहे ते अ‍ॅपच अजून सुरू करण्यात आलेले नाही.

रेल्वेच्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी ‘व्हीटीएस’ यंत्रणा कार्यान्वित करत आहे. या यंत्रणेमुळे प्रवाशांना एसटी बसची माहिती समजू शकणार आहे. संबंधित एसटी कोणत्या भागातून धावत आहे, सध्या कुठे आहे, संबंधित बस स्थानकावर येण्यास किती वेळ लागेल, बस कुठे थांबली आहे, सुटण्याची आणि पोहोचण्याची वेळ प्रवाशांना या यंत्रणेमुळे समजण्यास सोपे जाणार आहे. अ‍ॅप नसल्याने हे सर्व रखडले आहे.

हे ही वाचा:

गांधीनगर महापालिकेत भाजपाच सरस

‘त्या’ १२ षटकांनी वाजवले राजस्थानचे बारा!

हिटमॅनचा आणखीन एक सुपरहिट रेकॉर्ड! ठरला पहिलाच भारतीय

रावणाची भूमिका करणारे त्रिवेदी यांचे निधन

एसटी बसचे वेळापत्रक सुधारण्यासाठी आणि सद्यस्थिती प्रवाशांना कळावी यासाठी ‘व्हीटीएस’ प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आपत्कालीन परिस्थिती वा अपघात झाल्यास मदत पोहचवणे अधिक सोयीचे होणार आहे. पण हे अ‍ॅप सध्या सुरू नसल्यामुळे प्रवाशांना त्याचा लाभ घेता येत नाही.

एसटीची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना बस नेमकी कुठे आहे हे समजावे यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे व्हीटीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. प्रत्येक स्थानकात डिस्प्ले बोर्ड बसविण्यात आले असून, इतर तांत्रिक बाबींची पूर्तता सुरू असून लवकरच अ‍ॅप सुरू होईल अशी माहिती एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,446अनुयायीअनुकरण करा
4,450सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा