34 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरदेश दुनियाराहुल गांधी राजकारण करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये दाखल

राहुल गांधी राजकारण करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये दाखल

Google News Follow

Related

हाथरसच्या घटनेचे राजकारण केल्यानंतर आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा दाखल झाले आहेत ते शेतकऱ्यांच्या मृत्युचे राजकारण करण्यासाठी.

राहुल गांधी यांच्यासमवेत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबचे नवे मुख्यमंत्री चन्नी हेदेखील आहेत. विमानाने ते लखनऊकडे निघाले. लखीमपूर येथे चार शेतकऱ्यांचा गाडीखाली चिरडून मृत्यू झाल्यानंतर राजकारण तापले आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी वड्रा या याआधीच लखीमपूरमध्ये जाण्यासाठी तिथे पोहोचल्या होत्या, पण त्यांना तिथे जाऊ दिले नाही. त्यावेळी पोलिसांशी त्यांनी हुज्जत घातली आणि आपल्याला स्पर्श केल्यास तो विनयभंग ठरेल, असे म्हणत त्यांनी पोलिसांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला.

हाथरसला झालेल्या बलात्कार प्रकरणातही गांधी भावंडांनी पीडितेशी संवाद साधण्यासाठी आकांडतांडव केले होते. त्याचीच पुनरावृत्ती आता काँग्रेसने लखीमपूरच्या घटनेनंतरही करायचे ठरविले आहे.

 

हे ही वाचा:

हिटमॅनचा आणखीन एक सुपरहिट रेकॉर्ड! ठरला पहिलाच भारतीय

बसच्या लोकेशनची यंत्रणा तर बसविली, पण अ‍ॅप सुरूच नाही!

डोंबिवलीत रेल्वे रुळाजवळ आढळला मृतदेह; अपघात की खून?

‘त्या’ १२ षटकांनी वाजवले राजस्थानचे बारा!

 

लखीमपूर येथे भाजपाचे मंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशीष मिश्रा यांच्या गाडीखाली चार शेतकरी चिरडल्याची ही घटना आहे. पण यात तीन भाजपा कार्यकर्तेही मृत्युमुखी पडले आहेत. त्यांना या आंदोलक शेतकऱ्यांपैकी काहींनी लाठ्याकाठ्यानी ठार मारले आहे. एका पत्रकाराचाही या घटनेत मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेत केवळ शेतकऱ्यांच्या मृत्यूचे आता राजकारण सुरू झाले आहे. मात्र भाजपा कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने मारण्यात आले, त्याबद्दल कोणताही राजकीय पक्ष बोलण्यास तयार नाही.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा