30 C
Mumbai
Friday, September 17, 2021
घरदेश दुनियाआता रणवीरला सगळे म्हणणार, अलीबाग से आया है क्या!

आता रणवीरला सगळे म्हणणार, अलीबाग से आया है क्या!

Related

बॉलिवूडची बहुचर्चित जोडी अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह आता अलिबागवासी झालेले आहेत.

रणवीर दीपिका आता कायदेशीररीत्या अलिबागमधील जागेचे मालक झालेले आहेत. दोघांनी मिळून नुकतीच महागडी शॉपिंग केली आहे. रणवीर आणि दीपिकाने मुंबईपासून जवळच असलेल्या अलिबागमध्ये तब्बल ९० गुंठे जागा खरेदी केली आहे. अलिबागमधील मापगाव या भागात त्यांनी ही जागा जवळपास २२ कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आहे. या जागेच्या रजिस्ट्रेशनसाठी या जोडीने नुकतीच अलिबागच्या रजिस्ट्रार कार्यालयात हजेरी लावली होती.

दीपिका आणि रणवीरने आलिबागमध्ये खरेदी केलेल्या या जागेत दोन आलिशान बंगले असून, नारळ आणि सुपारीच्या तयार बागा देखील आहेत. या जागेच्या नोंदणीसाठी रणवीर आणि दीपिकाने नुकतीच अलिबागमध्ये हजेरी लावली होती. यावेली आपल्या लाडक्या जोडीची एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहते जमा झाले होते.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि पती रणवीर सिंह लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. सिनेसृष्टीचे आघाडीचे कलाकार रणवीरसिंग कपूर आणि दीपिका पदुकोण हे आता अलिबागकर झाले आहेत. अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे ९० गुंठे एनए जागा २२ कोटीला खरेदी केली आहे. मुंबईपासून जवळ असलेल्या अलिबागमध्ये आता दीपिका आणि रणवीरने दोन बंगले खरेदी केले आहेत.

हे ही वाचा:

…या कारखान्यात सगळी कामे सांभाळत आहेत फक्त महिला

मुंबईत ३३ हजार खड्डे बुजवल्यानंतरही रस्त्यांची चाळणच!

साहेब…गर्लफ्रेंड मिळत नाही! राजूराच्या मज्नूचे काँग्रेस आमदाराला पत्र

वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला भाजपाची जोरदार चपराक

दीपिका आणि रणवीरने खरेदी केलेल्या या जागेत दोन बंगले असून नारळ सुपारीची बाग आहे. सोमवारी अलिबाग येथील दुय्यम निबंधक कार्यलयात याची नोंदणी करण्यासाठी दीपिका आणि रणवीर दोघेही आले होते. त्यानंतर त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,408अनुयायीअनुकरण करा
3,030सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा