अमेरिकेचे ४७वे राष्ट्राध्यक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प हे २० जानेवारी अर्थात सोमवारी शपथग्रहण करणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी देशविदेशातील अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यात भारताचे आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांचाही समावेश आहे. रविवारी मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांनी ट्रम्प यांची भेट घेतली. अंबानी कुटुंब हे १८ जानेवारीलाच वॉशिंग्टन येथे दाखल झाले.
२० जानेवारीला ट्रम्प हे शपथग्रहण करतील त्यानंतर पुढील आठवडाभर ट्रम्प नॅशनल गॉल्फ क्लब विर्जिनिया येथे मोठा जल्लोष आयोजित करण्यात आला आहे.
अंबानी यांच्यासह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन उपस्थित राहणार असून टेल्साचे प्रमुख एलन मस्क, ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस, मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग, ऍपलचे सीईओ टिम कूक, टीकटॉकचे सीईओ शो च्यू यांचाही मान्यवरांमध्ये समावेश आहे.
हे ही वाचा:
शेखर यादव यांच्या समान नागरी कायद्याबाबतच्या वक्तव्याविरोधात डावे एकवटले!
भारत ठरला पहिल्या खोखो विश्वचषकाचा विजेता; पुरुष-महिला संघांनी जिंकली फायनल
दिल्ली निवडणुकीनंतरच भाजपला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष!
सैफ अली खान वर हल्ला करणारा बांगलादेशी घुसखोर, ठाण्यातून अटक
भारतीय वेळेनुसार २० जानेवारीला रात्री १०.३० ला हा सोहळा पार पडेल. अमेरिकेच्या २३० वर्षांच्या इतिहासात ट्रम्प हे पराभूत होऊन पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष बनलेले दुसरे व्यक्ती आहेत. याआधी ग्रोव्हर क्लिव्हलँड यांनी ही कामगिरी केली होती.
या शपथविधी सोहळ्यात राष्ट्राध्यक्ष बायबलच्या प्रतिवर हात ठेवून शपथ घेतात. अर्थात, आपल्याला आपल्या आवडीचे राजकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रातील प्रमुख पुस्तकाची निवड करता येते. ट्रम्प यांच्यासोबत उपाध्यक्ष वान्स हेदेखील शपथ घेणार आहेत.







