28 C
Mumbai
Wednesday, March 29, 2023
घरदेश दुनिया'किसानपुत्र आंदोलनानिम्मित्त' आज संपूर्ण महाराष्ट्रांत उपोषण

‘किसानपुत्र आंदोलनानिम्मित्त’ आज संपूर्ण महाराष्ट्रांत उपोषण

आजच्या दिवशी सहवेदना व्यक्त करण्यासाठी उपवास केला जातो.

Google News Follow

Related

शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी आजच्याच दिवशी महाराष्ट्रात  किसानपुत्र आंदोलना निमित्त उपवास केला जातो. किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी याबाबतची माहिती दिली आहे. १९ मार्च १९८६ ह्या दिवशी ‘शेतकरी साहेबराव करपे’  कुटुंबीयांनी आत्महत्या केली होती. करपे कुटुंब हे चिलगव्हाण जिल्हा यवतमाळ इथले होते. म्हणूनच या गावात १९ मार्च रोजी सामूहिक उपोषण केले जाणार असून सुतक सुद्धा पाळले जाणार आहे. अशी माहितीही हबीब यांनी दिली आहे.  यवतमाळ जिल्ह्यातल्या चिलगव्हाण इथल्या साहेबराव करपे या शेतकऱ्यांने आपली पत्नी आणि चार मुलांसह विनोबा भावेंच्या आश्रमांत पवनारला १९ मार्च १९८६ला आत्महत्या केली होती.

आत्महत्या करण्यापूर्वी साहेबराव करपे यांनी शेतकऱ्याच्या भीषण स्थितीचे वर्णन केलेले एक पत्र लिहिले होते. त्या पत्रात त्यांनी आमच्या आत्महत्या झाल्यामुळे तरी सरकारला जाग येईल आणि इतर शेतकऱ्यांसाठी तरी सरकार काही चांगले धोरण आखतील अशी आशा  त्या पत्रात व्यक्त केली होती. सरकारी अहवालानुसार ती देशातील ‘पहिली आत्महत्या’ होती असे म्हंटले आहेत. म्हणून आजच्या दिवशी १९ मार्चला महाराष्ट्रात विविध ठिकाणी अन्नदात्यासाठी एक दिवसाचा उपवास करण्यात येतो अशी या आंदोलनाची संकल्पना आहे.

हे ही वाचा:

ऍड. पृथ्वीराज झाला यांना पोलिसांकडून मारहाण, वकिलांचे एक दिवसाचे काम बंद आंदोलन

अवघ्या ४५ दिवसांत बाजी पलटलीअदाणींचे दिवस पालटले आणि क्रेडीट स्वीसचेही…

तालिबानी घेणार भारताकडून ऑन लाईन प्रशिक्षण

भारताच्या पंतप्रधानांना शांततेचे नोबेल मिळणार का?

२०१७ सालापासून दरवर्षी  किसानपुत्र आंदोलना निमित्त उपोषण किंवा अन्नत्याग केला जातो. दोन्ही शेतकरी संघटनांसह अनेक स्थानिक संस्था आणि संघटना या उपवास आंदोलनात सहभागी होणार आहे. अमरावतीच्या पंचवटी चौकात राष्ट्रीय ओबीसी किसान संघाच्या वतीने उपोषण केले जाणार असून वाशीम जिल्ह्यातील भूमिपुत्र शेतकरी संघटनांकडून वेगवेगळ्या ठिकाणी उपोषण केले जाणार आहे. वरुड, मोर्शी, वाटोर , येथे किसानपुत्र आणि अन्य संघटना मिळून हा उपवास करणार आहेत.  नागपूर, आकोट, मूर्तिजापूर, उमठा , सावनेर या ठिकाणीसुद्धा उपोषण केले जाणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,877चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा