28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरदेश दुनियाजकार्तामध्ये तेल गोदामाला लागलेल्या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू

जकार्तामध्ये तेल गोदामाला लागलेल्या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू

आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि धुराचे ढग यामुळे या भागात एकच गोंधळ उडाला. आगीत अनेक जण भाजल्याने गम्भीर जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Google News Follow

Related

इंडोनेशियाच्या राजधानीत शुक्रवारी एका इंधन साठवणुकीच्या डेपोला भीषण आग लागली. या अपघातात १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे . या अपघातात डझनभर लोक जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि धुराचे ढग यामुळे या भागात एकच गोंधळ उडाला. हे तेल गोदाम सरकारी कंपनीचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

उत्तर जकार्ता मधील पेरटामिन या सरकारी तेल कंपनीच्या गोदामाला अचानक आग लागली. ही आग भडकल्याने आसपासच्या भागातील लोकांमध्ये घबराट पसरली. प्रत्येक जण जीव वाचवण्यासाठी पळू लागले. स्थानिक वेळेनुसार रात्री आठ वाजता आग लागली. अग्निशमन दलाच्या ५२ गाड्या आगीवर नियंत्रण मिळवाण्याची शर्थ करत आहेत. आगीत भाजलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. आगीत अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा वाढू शकतो.

सध्या आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. या आगीत दोन मुलांसह १७ लोकांचा मृत्यू झाला, तर किमान ५० जण जखमी झाले. या आगीत अनेक जण होजपळुन गंभीर जखमी झाल्याचे अग्निशमन दलाने म्हटले आहे. प्रशासनाने तातडीने परिसरातील निवासी जागा रिकामी केली आहे.

हे ही वाचा:

हिजबुल मुजाहुद्दीनच्या कमांडरची बारामुल्लाहमध्ये मालमत्ता जप्त

गुजरातमधील कंपनीवर ईडीच्या छाप्यात इतक्या कोटींचे हिरे जप्त

सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली, दिल्लीतील रुग्णालयांत केले दाखल

सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली, दिल्लीतील रुग्णालयांत केले दाखल

आग लागल्यावर काही तासांतच ती नियंत्रणात आणण्यात आली.आगीचे करणं अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीच्या कारणांचा शोध घेण्यात येत असल्याचे इंडोनेशियाचे लष्कर प्रमुख डुडुंग अब्दुराचमन यांनी सांगितले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि जवळच्या कामगारांना आणि रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्या येत असल्याचे पेरटामिना कंपनीने म्हटले आहे . अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कंपनी अंतर्गत आढावा घेणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा