अमेरिकेत कॅलिफोर्नियात पुन्हा एकदा अग्नितांडव सुरू झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लॉस एंजेलिसमध्ये आगीने हाहाःकार उडवून दिलेला असताना आता ही आग पुन्हा एकदा भडकली आहे. माहितीनुसार, ही आग लॉस एंजेलिसच्या उत्तरेकडील ह्युजेस भागात लागली असून या आगीत सुमारे १०,००० एकर क्षेत्र जळून खाक झाले आहे. प्रशासनाने ५० हजार लोकांना घरे सोडण्याचे आदेश दिले आहे.
लॉस एंजेलिसमधील जंगलात पुन्हा नवीन आगीचा वणवा भडकला आहे. यापूर्वी लागलेल्या आगीत लोकांचे मोठे नुकसान झालेले असताना आता पुन्हा एकदा हजारो लोकांना स्थलांतर होण्याच्या सूचना दिल्या आहेत. बुधवारी सकाळी लॉस एंजेलिस शहराच्या वायव्यकडील सुमारे ४५ मैल अंतरावर असलेल्या अनेक निवासी क्षेत्र आणि शाळांना लागून असलेल्या डोंगराळ भागात आग लागली आहे. बुधवारी लागलेला वणवा काही तासांतच ९,२०० एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर पसरला. जोरदार वारा आणि सुकलेल्या झुडुपांमुळे ही आग वेगाने पसरली आहे. सुदैवाने, अजूनपर्यंत यात कोणत्याही घराचे अथवा व्यवसायाचे नुकसान झालेले नाही.
हे ही वाचा :
‘लाडकी बहीण योजने’चा लाभ घेणाऱ्या बांगलादेशी महिलेला मुंबईतून अटक
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात दावोसमधून दुसऱ्या दिवशी १५ लाख कोटींहून अधिकची गुंतवणूक
कपिल शर्मा, राजपाल यादवसह चार कलाकारांना बिष्णोईच्या नावे धमकीचा मेल
गाडीने उडवल्याने ११ जणांचा मृत्यू!
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी विमानातून पाणी फवारले जात आहे. मात्र, सततच्या जोरदार वाऱ्यामुळे आग पसरत असून हा धोका वाढणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून या प्रदेशात पुन्हा एकदा रेड फ्लॅगचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या भागातील सुमारे ३१ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर आणखी २३ हजार लोकांना या भागातून दुसरीकडे जावे लागू शकते, असा इशाराही दिला आहे. तर, या भागातील एका तुरुंगातून जवळपास ५०० कैद्यांना दुसरीकडे हलवण्यात आले आहे.







