हंताव्हायरसच्या संसर्गामुळे चर्चेत आलेले लक्झरी क्रूझ जहाज ‘एमव्ही होंडियस’ अखेर स्पेनमधील टेनेरिफ बेटाजवळ पोहोचले असून आता संपूर्ण जगाचे लक्ष या जहाजाकडे लागले आहे. या जहाजावर आतापर्यंत आठ जणांना संसर्गाची लक्षणे आढळली असून त्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका डच दाम्पत्याचा आणि एका जर्मन नागरिकाचा समावेश आहे. या घटनेनंतर जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO आणि युरोपियन आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
हे जहाज अटलांटिक महासागरातून प्रवास करत स्पेनमध्ये दाखल झाले. सुरुवातीला केप व्हर्डे या आफ्रिकन बेट राष्ट्राने जहाजाला किनाऱ्यावर येण्यास परवानगी नाकारली होती. त्यानंतर WHO आणि युरोपियन युनियनने स्पेन सरकारकडे मदतीची विनंती केली. अखेर स्पेनने मानवतावादी भूमिकेतून जहाजाला टेनेरिफ येथे थांबण्याची परवानगी दिली.
हे ही वाचा:
‘ऐसा कोई सगा नहीं, जिसे काँग्रेसने ठगा नहीं’
अशी गाठली चांदीने ऐतिहासिक उंची
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सुप्रिया सुळे यांच्या गाडीला अपघात
रिलायन्स समूहाशी संबंधित प्रकरणांमध्ये मुंबईतील १७ ठिकाणी छापेमारी
जहाजावर सुमारे २३ देशांतील १४९ प्रवासी आणि क्रू सदस्य आहेत. स्पेनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्व प्रवाशांना “हाय रिस्क कॉन्टॅक्ट” म्हणून घोषित केले आहे. जरी सध्या बहुतेक प्रवाशांमध्ये गंभीर लक्षणे नसली तरी खबरदारी म्हणून प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. प्रवाशांना छोट्या बोटींच्या मदतीने किनाऱ्यावर आणले जात असून त्यानंतर त्यांना विशेष बंद बसमधून विमानतळावर नेले जाणार आहे. तेथून त्यांना त्यांच्या देशात पाठवले जाईल.
WHO प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयसस स्वतः टेनेरिफ येथे पोहोचले आहेत. त्यांनी स्थानिक नागरिकांना घाबरू नका असे आवाहन करत “ही कोविडसारखी परिस्थिती नाही” असे स्पष्ट केले. तरीदेखील बेटावरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण हंटाव्हायरसचा “अँडीज” प्रकार माणसातून माणसात पसरण्याची दुर्मिळ क्षमता ठेवतो, अशी माहिती समोर आली आहे.
या जहाजाचा प्रवास अर्जेंटिनातून सुरू झाला होता. अंटार्क्टिका आणि दक्षिण अटलांटिकमधील काही दुर्गम बेटांवर पर्यटनासाठी हे जहाज गेले होते. दरम्यान काही प्रवासी आजारी पडू लागले आणि परिस्थिती गंभीर होत गेली. एका प्रवाशाचा मृत्यू जहाजावरच झाला, तर इतर काहींना गंभीर श्वसनाचा त्रास झाला. WHO च्या मते, या प्रकरणात जागतिक स्तरावर धोका कमी असला तरी जहाजावरील संसर्गाचा धोका “मध्यम” मानला जात आहे.
दरम्यान, भारत सरकारनेही खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य देखरेख वाढवली आहे. या जहाजावर दोन भारतीय नागरिक असल्याची माहिती समोर आली असून सध्या त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत







