28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरदेश दुनियाअबब...वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनला मिळणार एवढे कोटी रुपये

अबब…वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनला मिळणार एवढे कोटी रुपये

Google News Follow

Related

आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचे बक्षीस आयसीसीकडून जाहीर करण्यात आले आहे. ही स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला चषक आणि रोख रक्कम बक्षीस रूपाने देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या विजेत्या संघाला तब्बल १२ कोटी रुपये मिळणार आहेत. तर उपविजेत्या संघाला अंदाजे ६ कोटी रुपये मिळणार आहेत.

१८ जून पासून भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ठेवण्यात येणार आहे. १८ जून ते २२ जून या कालावधीत क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्लंडमधील ‘लॉर्ड्स’ या स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले असून आयसीसीच्या पहिल्या वहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असतील.

हे ही वाचा:

मेड इन पुणे ३डी मास्क

शेकडो वर्षांची परंपरा मोडण्याचं पाप करू नका

मराठा आरक्षणावर आमच्यात एकमत

एक बातमी आणि अदानी समूहाचे नुकसान

सोमवार १४ जून रोजी आयसीसी मार्फत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप या स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम जाहीर करण्यात आली. या स्पर्धेच्या विजेत्या संघाला १२ कोटी रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून दिले जाणार आहेत. तर उपविजेत्या संघाला अंदाजे सहा कोटींच्या आसपास ची रक्कम ही बक्षीस म्हणून मिळेल असे आयसीसीकडून सांगण्यात आले. जर हा सामना अनिर्णीत राहिला तर बक्षिसाच्या दोन्ही रकमा एकत्रीत करून दोन्ही संघात त्याची समान विभागणी केली जाईल.

विजेत्या व उपविजेत्या संघासोबतच स्पर्धेत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या संघांनाही रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. अंकतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या संघाला चार कोटी रुपयांची रोख रक्कम दिली जाणार आहे. तर चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या संघाला अडीच कोटी रुपये बक्षिसाच्या स्वरूपात मिळणार आहेत

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा