30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरदेश दुनिया'लस- पर्यटनात' भारतीयांची रशियाला पसंती

‘लस- पर्यटनात’ भारतीयांची रशियाला पसंती

Google News Follow

Related

भारतामध्ये कोविडची दुसरी लाट फोफावली आहे. त्याबरोबरच भारतात लसीकरण देखील जोमाने चालू आहे. भारताने रशियाच्या स्पुतनिक लसीला मान्यता दिली आहे. परंतु ही लस हळूहळू उपलब्ध होत आहे. त्यामुळे देशात सद्या ‘लस-पर्यटना’ला चालना मिळताना दिसत आहे. त्यासाठी अनेकांकडून मॉस्कोला पसंती दिली जात आहे.

दिल्लीतील एका पर्यटन कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे २४ दिवसांचे पॅकेज उपलब्ध करून दिले जात आहे. १.३ लाख रुपयांच्या या पॅकेजमध्ये स्पुतनिकचे दोन्ही डोस आणि मधले २१ दिवस काही फिरण्याच्या ठिकाणांचा समावेश होतो.

रशियामध्ये पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी मॉस्कोत स्पुतनिक लसीची पहिली मात्रा दिली जाते. कमीत कमी सात दिवस राहिलेल्या परदेशी नागरिकांना रशियात लस घ्यायला परवानगी असल्याचे कळले आहे. मात्र त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असते. ती नोंदणी या पर्यटकांसाठी आधिच या एजंटमार्फत केली जाते.

स्पुतनिक व्हीच्या अधकृत ट्वीटर हँडलवरून लस पर्यटनाचे आवाहन करणारे ट्वीट करण्यात आले होते. परंतु याबाबतची अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

हे ही वाचा:

सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोहही करू शकते

मराठा आरक्षण: भाजपा नेत्यांनी पंतप्रधानांना भेटून बाजू मांडावी

काँग्रेस गिधाडांप्रमाणे प्रेतांवर नजर ठेवून आहे

कोरोनाला ‘इंडियन व्हायरस’ म्हणत चीनी देणग्यांची परतफेड

दिल्लीतीतल त्या पर्यटन कंपनीच्या पर्यटकांची पहिली ३० जणांची बॅच १५ मे रोजी गेली. यापैकी बहुतेक गुरुग्राममधील डॉक्टर होते. २९ मे रोजी निघणाऱ्या दुसऱ्या बॅचमधील सर्व जागा भरल्या आहेत. इथून चाणारा चमू तीन दिवस सेंट पीटर्सबर्गमध्ये व्यतीत करतो, तर उर्वरित दिवस ते मॉस्कोमध्ये राहतात. या पॅकेजमध्ये एअरोफ्लोट या विमानकंपनीचे तिकीट, नाष्टा, जेवण आणि काही दिवसांचे पर्यटन या सर्वांचा समावेश आहे. व्हिसा प्रक्रियेसाठी लागणारे १० हजार रुपये मात्र स्वतंत्र मोजावे लागतात.

सध्या रशिया हा भारतीयांना येण्यास परवानगी देऊन लस घेऊ देणाऱ्या मोजक्या देशांपैकी आहे. फक्त आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह असण्यावर या देशात प्रवेश मिळतो आणि त्यासोबत तिथे पोहोचल्यावर कोणत्याही प्रकारच्या विलगीकरणाची गरज देखील नाही. पर्यटनावरील निर्बंध शिथिल झाल्यानंतर दुबई आणि अमेरिकेलाही भारतीयांकडून पसंती दिली जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील न्यु यॉर्क मध्ये फिरती लसीकरण केंद्रे चालू करण्यात आली आहेत. तिथे पर्यटकांना लस घेण्याची परवानगी आहे. दुबई देखील लवरकरच पर्यटकांसाठी लसीकरण खुले करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे दुबईलाही पसंती दिली जाऊ शकते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा