25 C
Mumbai
Monday, January 17, 2022
घरदेश दुनियानासाचा अभ्यासक्रम पूर्ण करणारी जान्हवी दांगेती ठरली पहिली भारतीय   

नासाचा अभ्यासक्रम पूर्ण करणारी जान्हवी दांगेती ठरली पहिली भारतीय   

Related

आंध्र प्रदेशमधील तरुणी जान्हवी दांगेती हिने नुकताच नासाचा (NASA) अभ्यासक्रम पूर्ण केला. जान्हवीच्या यशामुळे देशाचे नाव मोठे झाले आहे. जान्हवीने नुकतेच अमेरिकेतील अलाबामा येथील केनेडी स्पेस सेंटरमध्ये नासाचा इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम (IASP) अभ्यासक्रम पूर्ण केला असून, ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय बनली आहे.

नासाच्या या अभ्यासक्रमासाठी जगभरातून केवळ २० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यामध्ये जान्हवीचा समावेश होता. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर जगभरातील १६ लोकांचा समावेश असलेल्या ‘टीम केनेडी’ साठी ‘मिशन डायरेक्टर’ म्हणूनही तिची नियुक्ती करण्यात आली. जान्हवी हिने १६ देशांमधील लोकांच्या गटाचे तिने नेतृत्व केले. तसेच तिने सूक्ष्म रॉकेट प्रक्षेपण देखील यशस्वीपणे केले.

हे ही वाचा:

कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी आणखी दोन लसींना मान्यता

‘आपण इथे कुत्री, मांजर आणि कोंबड्यांचे प्रतिनिधित्व करत नाही!

लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोटाच्या मास्टरमाईंडला अटक

दिव्यांग रिक्षाचालकाला आनंद महिंद्रा यांनी दिली ‘ही’ ऑफर

नासाच्या या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शून्य गुरुत्वाकर्षण, पाण्याखालील रॉकेट प्रक्षेपण, विमान हाताळणी आणि अंतराळासंबंधीत अन्य तंत्रज्ञानाचे कठोर प्रशिक्षण देण्यात आले. जान्हवी ही आंध्र प्रदेशच्या पलाकोल्लू येथील अभियांत्रिकी शाखेत द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी असून ती अवघ्या १९ वर्षांची आहे. ‘मंगळ ग्रहावर पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या भारतीयांपैकी एक होण्याचे स्वप्न आहे,’ असे जान्हवीने सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,582अनुयायीअनुकरण करा
5,710सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा