33 C
Mumbai
Tuesday, October 26, 2021
घरदेश दुनियाअफगाणिस्तानातील 'घटना' कट्टरतेची जाणीव करून देणारी

अफगाणिस्तानातील ‘घटना’ कट्टरतेची जाणीव करून देणारी

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अफगाणिस्तानातील तालिबानच्या ताब्यावर भाष्य करत कट्टरतावादी शक्तींना रोखण्याची जगाला गरज असल्याचं म्हटलं आहे. शांघाई सहयोग संघटन म्हणजेच एससीओ संमेलन पंतप्रधान मोदी बोलत होते. अफगाणिस्तानात घडलेली ताजी घटना ही कट्टरतावाद किती मोठं आव्हान आहे हे स्पष्ट करते, त्यामुळे कट्टरतावादाविरोधातील लढाई ही केवळ क्षेत्रिय सुरक्षेसाठीच नाही तर तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठीही गरजेची असल्याचं मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संमेलनात नव्याने सहभागी झालेल्या ईराणचं स्वागत केलं. मोदी म्हणाले, ‘यंदा एससीओचं २० वं वर्ष आहे, आनंदाची गोष्टी ही आहे की या चांगल्या मुहूर्तावर आपल्यासोबत नवीन मित्र आले आहेत. मी ईराणचं नवीन मित्राच्या रुपाने स्वागत करतो. मी तिन्ही नवीन डायलॉग पार्टनर सउदी अरब, इजिप्त आणि कतारचंही स्वागत करतो.’

पंतप्रधान मोदींनी आपल्या संबोधनात, उदारतावादी, सहिष्णु मुस्लिमांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, एससीओने इस्लामशी निगडीत उदारमतवादी , सहिष्णू आणि सर्वसमावेशी संस्था आणि परंपरांना मजबूत करण्यासाठी काम करायला हवं. भारत आणि इस्लामिक देशांमध्ये उदारमतवादी, सहिष्णू आणि सर्वसमावेशी संस्थानं आणि परंपरा आहेत. एससीओला या सर्वांमध्ये एक मजबूत नेटवर्क बनवण्याची गरज आहे.

हे ही वाचा:

विराट कोहलीने केले होते रोहित शर्माला डावलण्याचे प्रयत्न

धक्कादायक: दहा डीसीपींकडून गोळा केले ४० कोटी रुपये

बीकेसीमध्ये ‘हा’ पूल कोसळला

तिरुपती देवस्थान समितीवर मिलिंद नार्वेकर कसे चालतात?

मोदी पुढे म्हणाले की, इतिहासावर नजर टाकली, तर मध्य आशिया हा उदारमतवादी आणि प्रगतीशील संस्कृती आणि मुल्यांचं माहेरघर राहिला आहे. सूफीवादासारखी परंपरा इथं शेकडो वर्षांपासून चालत आली आहे.

पंतप्रधान मोदींनी ताजिक लोकांचं स्वागताने भाषणाची सुरुवात केली. हे संमेलन ताजिकिस्तानची राजधानी दुशांबेमध्ये होत आहे. तिथं मोदी म्हणाले की, मी संपूर्ण भारताकडून ताजिक बंधु-भगिणींचं स्वागत करतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,443अनुयायीअनुकरण करा
4,420सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा