34 C
Mumbai
Wednesday, October 27, 2021
घरविशेषअजित दादांना पेट्रोल जीएसटीत का नको? वाचा सविस्तर...

अजित दादांना पेट्रोल जीएसटीत का नको? वाचा सविस्तर…

Related

केंद्र सरकारने इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणायला हालचाली सुरु केल्या आहेत. यामुळे पेट्रोलचे दर ₹६५ प्रति लिटर पर्यंत खाली येऊ शकतात. परंतु महाराष्टाचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मात्र याला विरोध केला आहे. एवढंच नाही तर राज्य सरकारला इंधनावर जास्तीत जास्त कर लादायचा असल्यामुळे केंद्र सरकारने पाऊल उचलू नये अशी उघड कबुलीदेखील दिली आहे.

पेट्रोल आणि डिझेलवर तीन प्रकारचे कर आहेत. एक्साईज ड्युटी, व्हॅट आणि उपकर. सध्या राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवर सुमारे ४१ टक्के उत्पादन शुल्क मिळते. व्हॅट राज्य सरकारांच्या वाट्याला जातो. पेट्रोलवर सध्या सुमारे ५० टक्के कर आहे. जर पेट्रोल आणि डिझेलचा २८ टक्के जीएसटीच्या उच्च स्लॅबमध्ये समावेश केला तर कर निम्म्यावर येईल. यामुळे दिल्लीतील ताज्या किमतीनुसार पेट्रोल २५ रुपयांनी स्वस्त होईल. असं झाल्यास राज्याला सध्या मिळत असलेल्या ४० हजार कोटींच्या उत्पन्नाला मुकावे लागेल. परंतु जनतेला होणारा फायदा आणि त्यातून अर्थव्यवस्थेला होणारा फायदा लक्षात घेता, ठाकरे सरकार नागरिकांच्या आणि अर्थव्यवस्थेच्या हिताला प्राधान्य देणार का महसूलाला हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राज्यातील सत्तेत असलेले तिन्ही पक्ष सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किमतीसंदर्भात आंदोलन करत आहेत, पण करापोटी राज्य सरकारला महसूलही मिळत असल्याचे स्पष्ट होते आहे. त्यामुळे एकीकडे पेट्रोल डिझेलमधून कराच्या रूपात महसूल मिळवायचा, पण त्याविरोधात आंदोलनही करायचे अशी दुटप्पी भूमिका ठाकरे सरकार घेत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

सध्या पेट्रोलवर लागणारी एक्साईज ड्युटी ३२.९० प्रतिलिटर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सतत बदलत असतात त्यामुळे पेट्रोलचे भाव दररोज बदलतात.

हे ही वाचा:

विराट कोहलीने केले होते रोहित शर्माला डावलण्याचे प्रयत्न

धक्कादायक: दहा डीसीपींकडून गोळा केले ४० कोटी रुपये

बीकेसीमध्ये ‘हा’ पूल कोसळला

तिरुपती देवस्थान समितीवर मिलिंद नार्वेकर कसे चालतात?

महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणारा मूल्यवर्धित कर देशात सर्वाधिक आहे. राज्याचा सुमारे १४ टक्के महसूल पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करातून येतो. महाराष्ट्रात पेट्रोलवर मूल्यवर्धित कर मुंबई-नवी मुंबई-ठाणे परिसरात मूल्याच्या २६ टक्के +१०.१२ रुपये प्रतिलिटर आणि अन्यत्र मूल्याच्या २५ टक्के +१०.१२ रुपये. म्हणजे साधारणतः मुंबई वगळता महाराष्ट्रात सध्या तो एकूण २६.३६ रुपयांइतका येतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,446अनुयायीअनुकरण करा
4,450सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा