पाकिस्तानच्या हवाई दलावर आरोप करण्यात आला की,त्यांनी केलेल्या ड्रोन हल्ल्यात त्यांचेच नागरिक मृत्युमुखी पडले. या हल्ल्यामुळे चार निष्पाप मुलांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला खैबर पख्तूनख्वा प्रांतातील उत्तर वझीरिस्तानमध्ये झाला. या मुलांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानसह संपूर्ण भागात तीव्र संताप उसळला आहे.
घटनास्थळ आणि लोकांचा संताप
मीर अली परिसरातील हुरमज गावात पाकिस्तानच्या हवाई दलाने ड्रोन हल्ला केल्याचा आरोप आहे. हा हल्ला १९ मे रोजी झाला. जेव्हा ही मुले घराबाहेर खेळत होती, तेव्हा अचानक पाकिस्तानी हवाई दलाच्या क्वाडकॉप्टरने बॉम्ब टाकला. या घटनेनंतर हुरमजसह आजूबाजूच्या लोकांनी रस्त्यावर उतरून हवाई दलाविरोधात तीव्र निदर्शने केली.
लोकांचा आरोप आहे की, सैन्याने दहशतवाद्यांवर कारवाईच्या नावाखाली सामान्य नागरिकांवर हल्ला केला आणि निष्पाप मुलांचे बळी गेले. सोशल मीडियावर या हल्ल्याचे भयावह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामुळे जनतेचा संताप अधिकच वाढला आहे.
जखमींवर उपचार
या हल्ल्यात चार मुलांचा मृत्यू झाला असून, एक महिला आणि इतर काही मुले मिळून पाच जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मीर अली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संरक्षण मंत्री गप्प
जेव्हा पत्रकारांनी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना याविषयी विचारले, तेव्हा त्यांनी काहीही उत्तर न देता तिथून निघून गेले. त्यांच्या या वागणुकीवरही मोठा संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, खैबर पख्तूनख्वाचे मदत व पुनर्वसन मंत्री हाजी नेक मोहम्मद दावर यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी म्हटले, “सर्व प्रकारचे सैनिकी ऑपरेशन नागरी भागांपासून दूर ठेवावेत, जेणेकरून निष्पाप लोकांचे प्राण वाचतील.”
JUI-F चे प्रमुख मौलाना फजलूर रहमान यांनी संसदेत म्हटले, “जर आजही वझीरिस्तानमध्ये ड्रोन पडत असतील, तर आपण भारताच्या ड्रोनना कसे प्रत्युत्तर देणार?”
हे ही वाचा:
महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा क्रीडा पत्रकार हा अविभाज्य भाग!
पाकला लपण्यासाठी जागाही मिळणार नाही…ते आपल्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात!
‘ऑपरेशन सिंदूर’ मदरशांच्या अभ्यासक्रमात शिकवले जाणार
मस्कत ते हिमालय; एव्हरेस्ट बेस कॅम्पला साजरा झाला वाढदिवस
बलुच समुदायाचा संताप
बलुच लेखक व कार्यकर्ते मीर यार बलुच यांनी या हल्ल्याला पाकिस्तानच्या ‘कट्टरपंथी सैन्याची क्रूरता’ असे म्हटले. त्यांनी म्हटले, “ही मुले शिकू इच्छित होती, हसू इच्छित होती, जगू इच्छित होती – पण पाकिस्तानी सैन्याने त्यांचे भविष्य उद्ध्वस्त केले.”
‘बलुच यकजहती कमिटी’ने (BYC) देखील या ड्रोन हल्ल्याचा निषेध केला. त्यांनी एक निवेदनात म्हटले की, “उत्तर वझीरिस्तानमध्ये घरांवर ड्रोन हल्ले, मुलांचा क्रूर संहार आणि पश्तून समुदायावरील अत्याचारांचा आम्ही तीव्र निषेध करतो.”
BYC ने असेही म्हटले की, “बलुचिस्तानप्रमाणेच पश्तून भागांमध्येही सरकारचा हिंसक आणि क्रूर पॅटर्न सुरु आहे. नागरी लोकांवर गोळीबार आणि ड्रोन हल्ले आता दैनंदिन प्रकार झाले आहेत, जे मानवाधिकारांचे गंभीर उल्लंघन आहे.”
आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष आणि सरकारची शांतता
ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा पाकिस्तानच्या सैन्यावर आधीच आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष आहे. या हल्ल्यामुळे देशांतर्गत असंतोषात आणखी भर पडली आहे. सामान्य लोक आणि मानवाधिकार संघटना सातत्याने सरकारच्या शांततेवर प्रश्न उपस्थित करत आहेत..







