उत्तराखंड मदरसा बोर्डाने राज्यातील मदरशांच्या अभ्यासक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’ समाविष्ट करण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे. उत्तराखंड मदरसा बोर्डाचे अध्यक्ष मुफ्ती शमून कासमी यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. उत्तराखंडमध्ये सध्या सुमारे ५०,००० विद्यार्थी असलेले ४५१ मदरसे आहेत. हे पाऊल राष्ट्रवाद आणि लष्करी अभिमान यांना शिक्षणाशी जोडण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे प्रयत्न मानले जात आहे.
उत्तराखंड मदरसा बोर्डाचे अध्यक्ष मुफ्ती शमून कासमी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी माहिती दिली की, ‘ऑपरेशन सिंदूर’ हे मदरशांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले जाईल. हा नवीन विषय आलिया (इंटरमीडिएट) स्तरापर्यंत शिकवला जाईल. उत्तराखंडमध्ये सध्या नोंदणीकृत असे ४५१ मदरसे असून त्यात सुमारे ५०,००० विद्यार्थी शिकत आहेत. या भेटीदरम्यान त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल सैन्याचे आणि सरकारचे अभिनंदनही केले. तसेच उत्तराखंड ही वीरांची भूमी आहे यावर भर देत म्हणाले की, देशातील लोकांनी सैन्याच्या शौर्याचे कौतुक केले आहे आणि मदरशाच्या विद्यार्थ्यांनाही या शौर्याबद्दल शिकवले जाईल. नवीन अभ्यासक्रमात ऑपरेशन सिंदूरवर एक प्रकरण असेल आणि ते अंतिम करण्यासाठी लवकरच अभ्यासक्रम समितीची बैठक घेतली जाईल, अशी माहिती आहे.
हे ही वाचा:
शीख गुरूंबद्दलच्या वादग्रस्त क्लिपमुळे ध्रुव राठीने युट्युबवरून व्हिडीओ हटवला
“राहुल गांधी नव्या युगाचे मीर जाफर”
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर काळाच्या पडद्याआड
राजधानी एक्स्प्रेसला घातपात करण्याचा होता कट
ऑपरेशन सिंदूर ही ७ मे २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची भारतीय लष्करी कारवाई होती. या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले होते. याचा मुख्य उद्देश हा होता की, जैश-ए-मोहम्मद (जेईएम), लष्कर-ए-तोयबा (एलईटी) आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या दहशतवादी गटांच्या पायाभूत सुविधा उध्वस्त करणे. केवळ २५ मिनिटांत हे तळ आंतरराष्ट्रीय सीमा न ओलांडता भारतीय लष्कराने उध्वस्त करून टाकले.
