मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने ‘ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन’ सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. हा सन्मान मिळवणारे मोदी हे पहिले भारतीय आहेत. हा पंतप्रधान मोदींना एखाद्या देशाने दिलेला २१ वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
भारतीय समुदायाच्या एका विशेष कार्यक्रमात मॉरिशसच्या पंतप्रधानांनी ही घोषणा केली. या प्रसंगी पंतप्रधान मोदींनी हा सन्मान नम्रतेने स्वीकारत सांगितले, “मॉरिशसच्या लोकांनी आणि इथल्या सरकारने मला त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचा निर्णय घेतला आहे. मी हा सन्मान विनम्रतेने स्वीकारतो.”
भोजपुरीतून संबोधनाची सुरुवात
पंतप्रधान मोदींनी आपले भाषण भोजपुरी भाषेत सुरू केले. त्यांनी आपल्या मागील मॉरिशस भेटीच्या आठवणी सांगताना म्हटले, “मित्रांनो, दहा वर्षांपूर्वी याच तारखेला मी मॉरिशसला आलो होतो. त्या वर्षी होळी एक आठवडा आधी झाली होती, आणि मी भारतातून फगवा (होळीचा उत्साह) घेऊन आलो होतो. आता यावेळी मॉरिशसचे रंग मी भारतात घेऊन जाणार आहे. भारतातही एक दिवसानंतर होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होईल.“
हे ही वाचा:
मध्य प्रदेशच्या चंबळ खोऱ्यात आता डाकुंची पैदास संपली, होणार शेती !
भारत आणि मॉरिशसने आठ सामंजस्य करार
रोहित निवृत्त होणार नाही, २०२७ वनडे विश्वचषक खेळणार!
हसीना शेख यांची मालमत्ता आणि नातेवाईकांसह १२४ बँक खाती जप्त करण्याचे आदेश!
भारत-मॉरिशस संबंधांवरील भाष्य
पंतप्रधान मोदी म्हणाले, “एकेकाळी भारताच्या पश्चिम भागात गोडधोड पदार्थांसाठी मॉरिशसहून साखर आणली जात असे. कदाचित याच कारणामुळे गुजराती भाषेत साखरेला ‘मोरस’ असे म्हणतात. काळाच्या ओघात भारत आणि मॉरिशस यांचे संबंध अधिक गोड होत गेले आहेत.”
त्यांनी मॉरिशसच्या नागरिकांना राष्ट्रीय दिवसाच्या शुभेच्छा देताना सांगितले, “मी जेव्हा येथे येतो, तेव्हा मला स्वतःच्या घरी असल्यासारखे वाटते. इथली माती, हवा आणि पाणी सर्वत्र आपलेपणाची भावना आहे.”
सन्मानाबाबत मोदींची प्रतिक्रिया
मोदी म्हणाले, “हा पुरस्कार फक्त माझ्यासाठी नाही, तर भारत आणि मॉरिशस यांच्या ऐतिहासिक नात्याचा सन्मान आहे. हा सन्मान त्यांच्या पूर्वजांचा सन्मान आहे, ज्यांनी पिढ्यान्पिढ्या या भूमीची सेवा केली आहे आणि मॉरिशसला उंच शिखरावर पोहोचवले आहे. मी हा सन्मान संपूर्ण भारताच्या वतीने स्वीकारतो.”
रामायण व मॉरिशसशी एक आठवण
पंतप्रधान मोदींनी १९९८ च्या आंतरराष्ट्रीय रामायण संमेलनाची आठवण सांगितली. त्यांनी म्हटले, “त्या वेळी मी कोणत्याही सरकारी पदावर नव्हतो. मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून येथे आलो होतो.” यावेळी त्यांनी मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांच्यासोबतचा संयोग सांगितला, “१९९८ मध्ये मी येथे आलो होतो, तेव्हाही नवीनजी पंतप्रधान होते. आता मी पंतप्रधान झालो, तेव्हा नवीनजी माझ्या शपथविधीला दिल्लीला उपस्थित होते.”
रामायणावरील आपल्या भक्तीविषयी बोलताना मोदी म्हणाले, “प्रभू श्रीराम आणि रामायणाविषयी माझी श्रद्धा तेंव्हाही होती आणि आजही ती अनुभवतो.”