२०२५ चॅम्पिअन्स ट्रॉफीत केएल राहुलच्या बँटिंग क्रमवारीत सतत बदल केले गेले. २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी टीम इंडियाने मोठ्या दिमाखात आपल्या नावावर केली. या अनेक सामन्यात सामने संपवण्याची कामगिरी केली. कोणतेही दडपण न घेता राहुलने ते लिलया पेलले आणि सामनने भारताच्या बाजूने झुकवले. चॅम्पिअन्स ट्रॉफीत अक्षर पटलले पाचव्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिल्यानंतर राहुल फिनिशरच्या भूमिकेत दिसला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने त्या भूमिकेत मिळवलेले यश हे त्याच्या संयम, नम्रता आणि परिस्थितीनुसार झपाट्याने बदल करण्याच्या क्षमतेचे प्रमाण आहे.
तुम्हाला कदाचित त्याचे चॅम्पिअन्स ट्रॉफीतील १३६ धावांचे योगदान किरकोळ वाटेल, पण त्याने भारतीय संघाच्या खालच्या मधल्या फळीत बजावलेली महत्त्वाची भूमिका याहून कितीतरी मोठी आहे.
‘राहुलने कधीच तक्रार केली नाही’ – प्रशिक्षक जयराज
केएल राहुलचे बालपणीचे प्रशिक्षक सॅम्युअल जयराज यांनी सांगितले, “त्याला जेव्हा फलंदाजीच्या क्रमवारीत खाली पाठवले गेले, तेव्हा त्याने कधीच तक्रार केली नाही. तो नेहमी विचारायचा, मी यात सुधारणा कशी करू शकतो? मला अशा परिस्थितीत का खेळायला हवे?”
“सहावा-सातवा क्रमांक म्हणजे फारच कमी चेंडू मिळतात. पण राहुल नेहमी कोणत्याही क्रमवारीत खेळण्यास तयार असतो. त्यामुळे मानसिकता बदलणे आणि परिस्थितीनुसार स्वतःला सामावून घेणे हे त्याच्यासाठी नवीन नाही. त्याने अनेक भूमिका पार पाडल्या आहेत, मात्र ही भूमिका वेगळी होती आणि त्याने त्यासाठी विशेष मेहनत घेतली. परिणामतः त्याने उत्तम कामगिरी केली.”
“जर तुम्ही फायनल पाहिली असेल, तर तुम्ही पाहाल की डावखुरा स्पिनर गोलंदाजी करत असताना, तो सहजपणे पॉइंट, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एकेरी धावा घेत होता. त्याने हा संपूर्ण डाव योजनेनुसार खेळला होता. राहुलला माहित होते की त्याला सामना जिंकून द्यायचा आहे.”
दुबईच्या संथ खेळपट्टीवर राहुलची संयमी खेळी
बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या विजयात राहुलच्या दबावाखाली जबाबदारी घेण्याच्या क्षमतेची मोठी भूमिका होती. दुबईच्या संथ खेळपट्टीवर त्याने केलेल्या ४१, ४२* आणि ३४* अशा महत्त्वपूर्ण खेळी भारतासाठी अमूल्य ठरल्या. जयराज यांच्या मते, राहुलने ही भूमिका यशस्वीपणे निभावली, याचे कारण त्याची स्मार्ट रणनीती होती.
“मी तुलनात्मक दृष्टिकोनातून पाहतो, तर विराट, शुभमन गिल आणि रोहित यांनी खूप चांगली कामगिरी केली. मात्र ते वेगवेगळ्या ठिकाणी खेळले. राहुलबाबत बोलायचे तर, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो फलंदाजीला आला नव्हता, पण इतर सामन्यांमध्ये त्याने महत्त्वाचे योगदान दिले.”
“ऑस्ट्रेलियाविरुद्धही त्याने दीर्घकाळ खेळण्याचा संयम दाखवला आणि खराब चेंडूंची वाट पाहत होता. सर्व जण म्हणतात की आम्ही मेहनत करतो, पण मला वाटते की यावेळी राहुलने अधिक हुशारीने आणि कष्टाने काम केले.”
२०२३ विश्वचषक अंतिम सामन्यातील टीकेनंतर पुनरागमन
२०२३ वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभव पत्करावा लागला. या सामन्यात राहुलने ६६ धावा केल्या. पण त्याचा स्ट्राईक रेट खूप कमी राहिला. यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.
रोहित आणि संघ व्यवस्थापनाने दिला विश्वास
जयराज यांनी कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाचे विशेष कौतुक केले. ज्यांनी राहुलवर विश्वास ठेवला आणि त्याला यशस्वी होण्यासाठी पाठिंबा दिला.
“संघाच्या प्रशिक्षकांनी ही भूमिका खूप चांगल्या पद्धतीने आखली होती. त्यांनी ही योजना व्यवस्थित मांडली आणि तिला यश मिळवून दिले. मी त्या प्रशिक्षकांना सलाम करतो, कारण त्यांनी योग्य नियोजन केले.”
“त्यांना माहित होते की त्यांना मधल्या फळीत असा खेळाडू हवा, जो डाव सावरू शकेल. त्यांनी राहुलवर विश्वास ठेवला आणि त्याला संधी दिली. त्यांनी कोणतेही प्रयोग केले नाहीत, कारण त्यांनी निश्चित केलेल्या योजनेवर त्यांचा ठाम विश्वास होता.”
केएल राहुलने आपली भूमिका योग्य प्रकारे स्वीकारली आणि ती मोठ्या संयमाने पार पाडली. चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्याच्या यशस्वी खेळीने त्याला भारतीय संघाच्या ‘सर्वोत्तम फिनिशर’पैकी एक म्हणून सिद्ध केले आहे.