31 C
Mumbai
Saturday, May 25, 2024
घरदेश दुनियापुतीन यांची पाश्चिमात्य देशांना अण्वस्त्र युद्धाची धमकी

पुतीन यांची पाश्चिमात्य देशांना अण्वस्त्र युद्धाची धमकी

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुतिन आक्रमक

Google News Follow

Related

युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये दोन वर्षांहून अधिक काळ होऊनही सुरू असलेलं युद्ध थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. या युद्धात रशियाला एकटं पडण्यासाठी काही पाश्चिमात्य देश पुढे आलेले असताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी मात्र अण्वस्त्र युद्धाची धमकी दिली आहे.

युक्रेनला मदत करण्यासाठी पाश्चात्य सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा धोका निर्माण होईल, असा थेट इशाराचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांचा हा इशारा आला आहे.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या आठवड्याच्या सुरूवातीला म्हटले होते की, युक्रेनमध्ये पाश्चात्य देशांचे सैन्य तैनात होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. या विधानाचा संदर्भ देऊन, पुतिन यांनी थेट असा इशारा दिला आहे.

रशिया- युक्रेन युद्धाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. युक्रेनच्या काही भागांवर रशियाने कब्जा केला आहे. तरीही दोन्ही देशांमध्ये तणाव कायम आहे. रशियावर काही देशांनी निर्बंध लादले आहेत. या वादात कोणीही हस्तक्षेप करणार नाही. जो कोणी रशियावर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल, त्याला दुसऱ्या विश्व युद्धाहून भयंकर परिणाम भोगण्यासाठी तयार रहावे लागेल, असा इशारा पुतिन यांनी दिला आहे.

हे ही वाचा:

वायनाडमध्ये कॉलेजवयीन विद्यार्थ्याची आत्महत्या; डाव्या चळवळीतील संघटनेच्या सहा सदस्यांना अटक

ब्रिटनस्थित गँगस्टरने स्वीकारली नाफेसिंग राठी यांच्या हत्येची जबाबदारी

ढाक्यात सातमजली इमारतीला आग; ४३ जणांचा मृत्यू

आयएसआयला गुप्त माहिती दिल्याप्रकरणी बिकानेर फायरिंग रेंजच्या संशयित कॅन्टीन ऑपरेटरला अटक

रशियामध्ये १५ ते १७ मार्च या कालावधीत अध्यक्षीय निवडणुक होणार आहे. पुतीन हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यांना आव्हान देणाऱ्यांना एकतर तुरुंगात टाकण्यात आले आहे किंवा ते परदेशात राहत आहेत. त्यामुळे पुतिन यांची पुन्हा निवड होणे हे खात्रीशीर मानले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
155,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा