34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरदेश दुनियाप्रजासत्ताक दिनाला भारतीय तोफांकडून सलामी

प्रजासत्ताक दिनाला भारतीय तोफांकडून सलामी

परेड बद्दल माहिती जाणून घ्या

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेनुसार यंदाचा ‘प्रजासत्ताक दिन’ सोहळा उत्साह, देशभक्ती आणि ‘जनभागीदारी’चा साक्षीदार असेल. या वर्षीच्या सोहळ्यांवर आधारित, स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी, ‘आझादी का अमृत महोत्सव’ म्हणून साजरा केला जाणार  आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २६ जानेवारी २०२३ रोजी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावरून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी राष्ट्राचे नेतृत्व करतील. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल ‘फताह अल-सिसी परेडचे’ प्रमुख पाहुणे असतील. स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारीपासून आठवडाभर चालणाऱ्या या सोहळ्याला सुरुवात झाली. त्या निमित्ताने २३ आणि २४ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे ‘आदी शौर्य – पर्व पराक्रम का’ हा एक प्रकारचा लष्करी टॅटू आणि आदिवासी नृत्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमांची सांगता ३० जानेवारी रोजी होईल, जो ‘शहीद दिन’ म्हणून साजरा केला जातो.

यावेळच्या ‘प्रजासत्ताक दिनी’ राष्ट्रध्वजाला ब्रिटीश तोफांनी सलामी देणार नसून प्रथमच भारतीय तोफांकडून सलामी दिली जाणार आहे. याशिवाय हवाईदल आकाशात नवीन इतिहास रचणार आहे.  ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत सरकारने ठरवले आहे की, यावर्षी प्रजासत्ताक दिनी जुन्या २५ पाउंडर तोफांऐवजी नवीन १०५ मिमी इंडीयन फील्डसह राष्ट्रध्वजाला २१ तोफांची सलामी दिली जाईल.

याबाबत माहिती देताना दिल्ली क्षेत्राचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल भवनीश कुमार यांनी सांगितले की, आम्ही स्वदेशीकरणाकडे जात आहोत आणि ती वेळ दूर नाही जेव्हा सर्व उपकरणे बंदुका ह्या स्वदेशी असतील. आकाश शस्त्र प्रणालीसह प्रदर्शित होणारी सर्व उपकरणे भारतात बनलेली आहेत. १९४० च्या सुरुवातीला बांधलेल्या २२८१ फील्ड रेजिमेंटच्या सात तोफांनी कर्तव्यपथावर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या परेडला सलामी दिली जाणार आहे.

१०५ भारतीय फील्ड गनची रचना १९७२ मध्ये करण्यात आली होती आणि ती गन कॅरेज फॅक्टरी जबलपूर आणि फील्ड गन फॅक्टरी कानपूर येथे तयार करण्यात आली होती आणि १९८४ पासून सेवेत आहे. देशभरातील नर्तकांच्या वंदे भारत गटाचे आकर्षक सादरीकरण, वीर गाथा या अंतर्गत शौर्याचे किस्से, राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे शालेय बँड्सचे मधुर सादरीकरण, यावर्षी पहिल्यांदाच ई-निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.

सकाळी साडे दहा वाजता सुरू होणारी प्रजासत्ताक दिनाची परेड, देशाच्या वाढत्या स्वदेशी क्षमता, नारी शक्ती आणि ‘न्यू इंडिया’च्या उदयाचे चित्रण करणारी, देशाचे लष्करी पराक्रम आणि सांस्कृतिक वैविध्य यांचे अनोखे मिश्रण यामध्ये बघायला मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन परेड सोहळ्याची सुरुवात करणार आहेत. शहीद वीरांना श्रद्धांजली वाहून नंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतील.

त्यानंतर, पंतप्रधान अभिवादन मंचाकडे जाऊन परंपरेनुसार, राष्ट्रध्वज फडकवण्याचा सोहळा होईल. त्यानंतर २१ तोफांची जोरदार सलामी देऊन राष्ट्रगीत होईल. पहिल्यांदाच यावेळी १०५ -मिमी भारतीय फील्ड गनसह २१ तोफांची सलामी दिली जाईल.  हे व्हिंटेज २५ पाऊंडर गनची जागा घेते, संरक्षणातील वाढत्या ‘आत्मनिर्भरता’चे प्रतिबिंबित करते. १०५ हेलिकॉप्टर युनिटचे चार एम आय  १७  हेलिकॉप्टर कर्तव्यपथावर उपस्थित प्रेक्षकांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करतील.

हे ही वाचा:

जाणून घ्या तुमच्या नेत्याला’

भाजपाचे मिशन मुसलमान २०२४

मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट दिले होते, पण…फडणवीस काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे भागम भागचा तिसरा भाग

सर्वोच्च शौर्य पुरस्कारांचे विजेते

त्यात परमवीर चक्र आणि अशोक चक्र विजेत्यांचा समावेश आहे. परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर (मानद कॅप्टन) बाना सिंग, आठ जेएके एलआय (निवृत्त); सुभेदार मेजर (मानद कॅप्टन) योगेंद्र सिंग यादव, १८ ग्रेनेडियर्स (निवृत्त) आणि सुभेदार (ऑनररी लेफ्टनंट) संजय कुमार, १३ जेएके रायफल्स आणि अशोक चक्र विजेते मेजर जनरल सीए पिठावाला (निवृत्त); कर्नल डी श्रीराम कुमार आणि लेफ्टनंट कर्नल जस राम सिंग (निवृत्त) जीपवरील उप परेड कमांडरच करतील. परमवीर चक्र शत्रूचा सामना करताना शौर्य आणि आत्मबलिदानाच्या सर्वात उल्लेखनीय कृतीसाठी प्रदान केले जाते, तर अशोक चक्र शत्रूचा सामना करताना अशाच प्रकारच्या शौर्य आणि आत्मत्यागाच्या कृतीसाठी प्रदान केले जाते. .

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा