31 C
Mumbai
Saturday, November 19, 2022
घरदेश दुनियासुनक सरकारच्या ब्रिटनच्या मंदीवर उपाययोजना करण्यास सुरुवात

सुनक सरकारच्या ब्रिटनच्या मंदीवर उपाययोजना करण्यास सुरुवात

लोकांनी ऋषी सुनक अपेक्षा ठेवायला सुरुवात केली होती.

Google News Follow

Related

गेल्या अनेक दिवसांपासून ब्रिटनची अर्थव्यवस्था अत्यंत वाईट परिस्थितीत आहे. ब्रिटनच्या माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांनी ४५ दिवसांच्या कार्यकाळानंतर अचानक राजीनामा दिला आणि भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाले. येत्या काळात ब्रिटनची अर्थव्यवस्था आणखी कमकुवत होण्यापूर्वी ऋषी सुनक यांनी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.

रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे ऊर्जांच्या किमतीत वाढ होत आहे. यामुळे ब्रिटनची अर्थव्यवस्था तोट्यात गेली आहे. लिझ ट्रस यांनी ४५ दिवसांत अचानक पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ऋषी सुनक यांनी आघाडी घेत ब्रिटनचे पंतप्रधानपद मिळवले. ऋषी सुनक हे या पूर्वी ब्रिटनचे अर्थमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे ऋषी सुनक पंतप्रधानांच्या शर्यतीत होते, तेव्हापासूनच लोकांनी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवायला सुरुवात केली होती. महागाईपासून सुटका मिळवण्यासाठी ऋषी सुनक काहीतरी उपाययोजना आखतील अशी आशा तेथील जनतेला होती.

हे ही वाचा : 

किशोरी पेडणेकरांच्या चार सदनिका पालिका ताब्यात घेणार

अर्थसंकल्पाची तयारी सुरू झाली!

स्कुल व्हॅन चालकाने विद्यार्थ्यांनीवर अतिप्रसंग करण्याचा केला प्रयत्न

श्रद्धा वालकर, लव्ह जिहाद आणि हिंदू-मुस्लिम विवाह

त्यानुसार सुनक यांच्या सरकारने ५ हजार ५०० कोटी पौंडची आर्थिक योजना सादर केली आहे. अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी सरकारचा आणीबाणीचा अर्थसंकल्प उघड केला. ज्यामध्ये कर दरांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. जेरेमी हंट यांनी सांगितलं की, संपूर्ण जग महागाईच्या आगीत होरपळत आहे. स्थिरता, विकास आणि सार्वजनिक सेवासह आपण मंदीविरोधात सामना करत आहोत. ब्रिटनमध्ये महागाईच्या दराने ४१ वर्षांचा रेकॉर्ड तोडला आहे. ऑक्टोबर महिन्यात महागाई दर ११.१ टक्के होता. १९८१ नंतरचा हा सर्वांत मोठा महागाई दर आहे. २०२४ पर्यंत मंदी ओसरण्याची शक्यता कमी असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,957चाहतेआवड दर्शवा
1,976अनुयायीअनुकरण करा
51,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा