33 C
Mumbai
Tuesday, October 26, 2021
घरक्राईमनामारश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये १९ बंगल्यांचा घोटाळा

रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये १९ बंगल्यांचा घोटाळा

Related

भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना कराडमध्ये पोलिसांनी रेल्वेतून उतरवलं. सोमय्यांनी तिथेच आज सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांनी ठाकरे सरकारवर कडाडून हल्ला चढवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर किरीट सोमय्यांनी कडाडून हल्ला चढवला.

सोमय्या यांनी म्हटलं की,  मी गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार आहे, तिथेही असाच घोटाळा आहे. पुढच्या सोमवारी २७ तारखेला उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये १९ बंगल्यांचा घोटाळा केलाय, त्याची पाहणी करण्यासाठी जाणार आहे. तर ३० तारखेला अजित पवारांनी बेनामी कारखाना जरंडेश्वर हा विकत घेतला, त्याची पाहणी करणार आहे. त्यावेळीही मला रोखणार आहे का? असा सवाल देखील सोमय्या यांनी केला आहे.

“ठाकरे सरकारची ठोकशाही आहे. गणेश विसर्जनापासून रोखलं, अंबाबाईच्या दर्शनापासून रोखलं, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनबाहेर मला रोखलं, ट्रेन मिळणार नाही हे पाहिलं, धक्काबुक्की केली. मी विचारलं कोणत्या अधिकाराअंतर्गत रोखताय, त्यावर त्यांनी मला कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांबाहेर जाण्यापासून रोखण्याचा आदेश उद्धव ठाकरे सरकारने दिला असं सांगितलं. आमच्या वैयक्तिक हक्कांवर गदा का? याचं उत्तर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी दिलं पाहिजे, असं किरीट सोमय्या म्हणाले.”

हे ही वाचा:

गडहिंग्लजसाखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी १०० ​कोटींचा घोटाळा केला

आज होणार हसन मुश्रिफांचा आणखीन एक घोटाळा उघड

जॅवलिन एक प्रेमकथा…नीरज चोप्राच्या जाहिरातीचा धमाका

पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर महिला आयएएस अधिकाऱ्याने काय केला होता आरोप?

“जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे रोखण्याचा मला ठाकरे सरकारने प्रयत्न केला. मी आदेशाची कॉपी मागितली, त्यात लिहिलं होतं, कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलाय सोमय्यांना मुंबई बाहेर जाऊ देऊ नये. त्यावर मी आक्षेप घेतला, त्यावर पोलीस पळून गेले.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,443अनुयायीअनुकरण करा
4,420सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा