31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
घरदेश दुनियाआयसीसीच्या 'या' खास पुरस्कारासाठी स्मृती मानधनाला नामांकन

आयसीसीच्या ‘या’ खास पुरस्कारासाठी स्मृती मानधनाला नामांकन

Google News Follow

Related

भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिच्यासाठी २०२१ हे वर्ष अविस्मरणीय ठरलं आहे. आज तिच्या सर्व फॉरमॅटमधील नेत्रदीपक कामगिरीसाठी आयसीसीने सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू या पुरस्कारासाठी तिला नामांकन दिले आहे. तर या सोबतच मानधानाला महिला टी-२० प्लेयर ऑफ द इयरसाठीही नामांकन मिळाले आहे.

महिला क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर, स्मृती मानधना व्यतिरिक्त इंग्लंडची क्रिकेटपटू टॅमी ब्युमॉन्ट आणि नॅट सायव्हर आणि आयर्लंडची गॅबी लुईस हे या पुरस्काराचे इतर दावेदार आहेत. यावर्षी मानधनाने टी-२० सामन्यांमध्ये ३१.८७ च्या सरासरीने २५५ धावा केल्या आहेत. ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच वेळी, २०२१ च्या आयसीसीच्या सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटूसाठी कोणत्याही भारतीय महिला किंवा पुरुष खेळाडूला नामांकन मिळालेले नाही.

हे ही वाचा:

लॉकडाऊनच्या निर्णयावरून ठाकरे सरकारमध्येच संभ्रम?

निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सरकारला आठवले वचन; ५०० स्क्वेअर फूटांपर्यंतच्या घरांना करमाफी

नवीन वर्ष महागाईचे की स्वस्ताईचे? वाचा सविस्तर

योगी आदित्यनाथ यांची जाहिरात कविता कृष्णन यांना झोंबली

दुसरीकडे कोणत्याही भारतीय पुरुष क्रिकेटपटूला टी-२० मध्ये देखील स्थान मिळालेले नाही. बांगलादेशचा शाकिब अल हसन, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, दक्षिण आफ्रिकेचा जानेमन मालन आणि आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग या पुरस्काराच्या शर्यतीत आहेत. या आधी मंगळवारी आयसीसीने पुरुष गटातील ‘टेस्ट प्लेयर ऑफ द इयर’ पुरस्कारासाठी नामांकित व्यक्तींची घोषणा केली होती. ज्यामध्ये भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या नावाचा समावेश होता. २०२१ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी अश्विनचे नामांकन करण्यात आले आहे.

यंदाच्या कसोटी गोलंदाजांमध्ये अश्विन सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याच्याशिवाय इंग्लंडचा कर्णधार जो रूट, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसन आणि श्रीलंकेचा फलंदाज दिमुत करुणारत्ने यांचीही ‘टेस्ट प्लेयर ऑफ द इयर’ पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा