34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरदेश दुनियाक्रूझ 'एमव्ही गंगा विलास' चा पहिला प्रवास २८ फेब्रुवारीला संपणार

क्रूझ ‘एमव्ही गंगा विलास’ चा पहिला प्रवास २८ फेब्रुवारीला संपणार

पर्यटन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे प्रतिपादन

Google News Follow

Related

वाराणसी येथून  १३ जानेवारी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी जगातील सर्वात लांब गंगा नदीवरील ‘क्रूझ एमव्ही गंगा विलास’ ला झेंडा दाखविला होता. ही क्रूझ  २८ फेब्रुवारीला आपला आसाममधील दिब्रुगढ येथे प्रवास संपवत आहे. भारत सरकारच्या बंदरे , जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणद्वारे, समारोपाच्या दिवशी २८ तारखेला स्वागत समारंभ आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय बंदरे , जहाजबांधणी, आणि जलमार्गमंत्री  सर्बानंद  सोनोवाल यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

भारतीय बनावटीची असलेली ही क्रूझ ‘एमव्हीगंगा विलास’ या जहाजाने प्रवास सुरु केल्यावर ती पाटणा , बोधगया, विक्रमशिला, ढाका , सुंदरबन, आणि काझीरंगा राष्ट्रीय उद्यान मार्गाने २८ फेब्रुवारीला दिब्रुगढ येथे पोहोचण्यापूर्वी  तिने एकूण ५० दिवसांत ३२०० किलोमीटरचे अंतर कापले आहे. उत्कृष्ट रंगसंगती आणि नवनवीन कल्पनांनी बांधलेल्या या क्रूझमध्ये एकूण ३६ पर्यटकांची क्षमता असलेले तीन डेक आणि १८ सुट्स बनवले आहेत. पुढच्या दोन वर्षांच्या जाण्यायेण्याच्या प्रवासासाठी ते आधीच बुक केले आहेत .

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढली लतादिदींची आठवण, रांगोळी, अंगाई गीत कलेची घेतली दखल

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उभारले होते क्रांतिचे मंदिर; अभिनव भारत मंदिर

सीमेंट, फायबर विटांखालून आणली जात होती दारू

उद्धव-केजरीवाल भेट; एकमेकांची पाठ खाजविण्याचे ‘मॉडेल’

‘एमव्ही गंगा विलासने’ भारत आणि बांग्लादेशला जलपर्यटनांत जगाच्या नकाशावर ओळख दिली आहे. त्यामुळे भारतीय उपखंडातील पर्यटन आणि मालवाहतुकीसाठी एक नवीन आणि मोठे क्षितिज निर्माण झाले आहे. अध्यात्मिक पर्यटकांना  काशी, बोधगया, विक्रमशिला , पाटणसाहिब, यासारख्या अध्यात्मिक ओळख असणाऱ्या शहरांना भेट देता येणार आहे. तर नैसर्गिक विविधतेने नटलेल्या अशा सुंदरबन आणि काझीरंगा या ठिकाणांना ज्यांना भेट द्यायची आहे त्यांना सुद्धा यामधून भेट देता येणार आहे,  असे केंद्रीय पर्यटन मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले.

भारत आणि बांग्लादेश या दोन्ही देशांच्या कला, संस्कृती, इतिहास आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम या प्रवासात पर्यटकांना अनुभवायला मिळणार आहे. असेही ते पुढे म्हणाले.  या अंतर्देशीय प्रवासात जलवाहतुकीच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी अनेक प्रकल्प पूर्ण केले गेले आहेत तर काही मार्ग प्रगतीपथावर आहेत. २०१७ या वर्षांमध्ये आयोजित केलेल्या आय डब्लू ए आय अंतर्गत अभ्यासानुसार , वार्षिक ४९ दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक ईशान्य प्रदेशात आणि बाहेर सुमारे ३० एमएमटीपीए मालवाहतूक सध्या ईशान्य प्रदेशांमध्ये होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा