28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरदेश दुनियासीएनएनच्या अँकरने हिजाब घातला नाही म्हणून इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी मुलाखतच दिली नाही

सीएनएनच्या अँकरने हिजाब घातला नाही म्हणून इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी मुलाखतच दिली नाही

इराणमध्ये सध्या हिजाबच्या मुद्द्यावरून गदारोळ माजला आहे, त्यातच न्यूयॉर्कमध्ये सीएनएन वाहिनीच्या अँकर ख्रिस्तीयन अमनपूर यांना विचित्र अनुभव आला.

Google News Follow

Related

इराणमध्ये सध्या हिजाबच्या मुद्द्यावरून गदारोळ माजला आहे, त्यातच न्यूयॉर्कमध्ये सीएनएन वाहिनीच्या अँकर ख्रिस्तीयन अमनपूर यांना विचित्र अनुभव आला. न्यूयॉर्क मध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांची मुलाखत घेण्यात येणार होती पण ख्रिस्तीयन यांनी हिजाब घालावा, अशी सक्ती त्यांना करण्यात आली. त्यानंतर, रायसी यांनी मुलाखत देणे टाळले. ख्रिस्तीयन यांनी मुलाखतीसाठी स्टुडिओमध्ये एकट्याच बसलेल्या असतानाचा फोटो शेअर करत ही घटना
सांगितली आहे.

ही मुलाखत घेण्यापूर्वी ख्रिस्तीयन यांना हिजाब घालण्याची सूचना करण्यात आली होती. पण त्यांनी ती अमान्य केली. आपण न्यूयॉर्कमध्ये आहोत आणि इथे अशी कोणतीही परंपरा नाही असे सांगत ख्रिस्तियन यांनी स्कार्फ घालण्यास नकार दिला. त्यासंदर्भात त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

सध्या इराणमध्ये जी आंदोलने हिजाबच्या विरोधात सुरू आहेत त्याबाबत अँकर प्रश्न विचारणार होत्या. इराणी महिला महसा अमिनी यांना गेल्या आठवड्यात हिजाब घातला नाही म्हणून मारहाण करण्यात आली होती. पोलीस ठाण्यात नेऊन त्यांना जबर मारहाण केल्यावर त्यांचा ब्रेन स्ट्रोकने मृत्यू झाला. त्यानंतर इराणमध्ये आंदोलने झाली. अनेक महिलांनी केस कापून आणि हिजाब जाळून हिजाबला विरोध दर्शवला.

हे ही वाचा:

अध्यक्ष व्हायचे असेल तर मुख्यमंत्रीपद सोडा

२३ सप्टेंबर : पाकिस्तानला धूळ चारणारा दिवस

अमेरिका का म्हणतोय UNSC मध्ये भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व द्या?

… आणि पंतप्रधान मोदींनी परभणीच्या चिमुरडीला पाठवलं पत्र

ख्रिस्तीयन म्हणाल्या की आम्ही या मुलाखतीसाठी कॅमेरे बसवले, सगळी तयारी केली. आठ तास त्यासाठी खर्च केले. मुलाखतीच्या निर्धारित वेळेनंतर ४० मिनिटांनी राष्ट्राध्यक्ष रायसी यांच्याकडून असे सांगण्यात आले की, मी हिजाब घालायचा आहे. त्याला मी नकार दिला. मोहरमचा पवित्र महिना असल्यामुळे हिजाब घालण्यास सांगण्यात आले होते. शेवटी आम्ही मुलाखतीच्या ठिकाणाहून बाहेर पडलो. याआधी आम्ही इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या मुलाखती इराणबाहेर घेतल्या आहेत पण अशी वेळ कधी आली नव्हती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा