27 C
Mumbai
Wednesday, September 28, 2022
घरदेश दुनियापाकिस्तानच्या पत्रकाराची वार्ता विघ्नाची

पाकिस्तानच्या पत्रकाराची वार्ता विघ्नाची

पाकिस्तानमधील एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे.

Related

भारताचा शेजारी देश पाकिस्तान सध्या भीषण महापुराचा सामना करत आहे. अर्ध्याहून अधिक देश पाण्याखाली गेला आहे तर १ हजारहून अधिक लोकांनी प्राण गमवाला आहे. पुराचे भयंकर व्हिडीओ समोर आले आहेत. त्यातच एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका पत्रकाराचा असून पुराचं कव्हरेज करतानाचा हा व्हिडीओ आहे. अनेकजण आपापल्या कामात स्वतःला अक्षरशः बुडवून घेत काम करतात. पाकिस्तानातील या पत्रकारानेही स्वतःला बुडवून घेतले.

पाकिस्तानमधील पुराचे वार्तांकन करताना एका रिपोर्टरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रिपोर्टर स्वतः गळयापर्यंत पाण्यात बुडालेला दिसतोय. पण अशा जीवघेण्या परिस्थितीमध्येही तो हातात माइक घेऊन परीस्थितीचं वार्तांकन करताना दिसत आहे.

या व्हिडीओला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत असून काहींनी त्याच्या चिकाटीचे कौतुक केले आहे. तर काहींनी या पत्रकाराला ट्रोल देखील केले आहे. जमिनीवर उभं राहून कॅमेऱ्याच्या मदतीनेही बातमी सांगता आली असती, असा सल्ला काहींनी या पत्रकाराला दिला आहे. तर काहींनी जीव धोक्यात टाकला म्हणून या पत्रकारावर टीका देखील केली आहे.

हे ही वाचा:

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्रूर मानत होतो, पण त्यांनीच माणुसकी दाखवली

‘स्वातंत्र्यदिनानिमित्त सामुहिक शक्तीचे घडले दर्शन’

गृहमंत्री अमित शहा मुंबईत ‘या’ गणेशोत्सवाला भेट देणार

सध्या पाकिस्तानात पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानमध्ये भयंकर महापूर आला असून जनजीवन विस्कळित झाले आहे. मुसळधार पावसामुळे पूर आला असून यात आतापर्यंत १ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये आता राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झाली करण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये असा भीषण पूर याधी कधीही आला नव्हता, असे पाकिस्तान सरकारचे म्हणणे आहे. पाकिस्तानी लष्करासह सार्वजनिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरु आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,967चाहतेआवड दर्शवा
1,941अनुयायीअनुकरण करा
40,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा