26 C
Mumbai
Wednesday, September 21, 2022
घरदेश दुनियाफ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन का झाले पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खुश?

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन का झाले पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खुश?

नुकत्याच झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) निमित्ताने व्यक्त केली भावना

Related

नुकतीच शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट झाली होती. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पुतीन यांना ‘ही युद्धाची वेळ नाही’ असा सल्ला दिला होता. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अनेक जागतिक नेत्यांकडून कौतुक होत आहे.

रशिया युक्रेन युद्धानंतर पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतीन यांची पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेट झाली. यावेळी झालेल्या द्विपक्षीय चर्चेत मोदींनी हा युद्धाचा काळ नसल्याचे त्यांनी सांगितले होते. दरम्यान, मोदींच्या या भूमिकेचं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी कौतुक केलं आहे.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७७ व्या अधिवेशनादरम्यान  पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही युद्धीची वेळ नाही सांगणं अत्यंत योग्य आहे. ही बदला घेण्याची किंवा पाश्चिमात्य विरुद्ध आशियाई देश असा विरोध करण्याची वेळ नाही. आपल्यासमोर असणाऱ्या आव्हानांना एकत्रितपणे सामोरे जाण्याची हीच वेळ आहे,” असं इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे. “उत्तर आणि दक्षिण दरम्यान एक प्रभावी करार विकसित करण्याची तातडीची गरज आहे. जो अन्न, जैवविविधतेसाठी, शिक्षणासाठी उपयुक्त ठरेल,” असंही ते म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

कॉमेडीचा बादशाह राजू श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड

पत्राचाळ प्रकरणातील पैशांनी संजय राऊतांनी ठाकरे चित्रपटाची निर्मिती केली

कोरोना काळात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेणार

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा गुजरातमध्ये

रशिया- युक्रेन युद्धादरम्यान भारताने तटस्थ भूमिका घेतली होती. तसेच नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्यात फोनवरून झालेल्या चर्चेत नरेंद्र मोदींनी पुतीन यांना शांततेत चर्चा करून मार्ग काढण्याचा वारंवार सल्ला दिला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,951चाहतेआवड दर्शवा
1,943अनुयायीअनुकरण करा
38,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा