34 C
Mumbai
Wednesday, October 27, 2021
घरधर्म संस्कृतीपालघरमध्ये ‘रावण पूजे’चा घाट; आदिवासींकडून आयोजनाला तीव्र विरोध

पालघरमध्ये ‘रावण पूजे’चा घाट; आदिवासींकडून आयोजनाला तीव्र विरोध

Related

दसऱ्यानिमित्त पालघरमध्ये रावणाच्या महापूजेचे आयोजनाचा घाट घालण्यात आला आहे. पण त्याला आदिवासी एकता मित्र मंडळाने तीव्र विरोध केला आहे. आदिवासी समाज प्रभू रामचंद्रांना आपले दैवत मानतो आणि लग्नविधी समारंभात राम राम म्हटल्याशिवाय तो सुखी संसाराला सुरुवात करत नाही, असे म्हणत या रावण पूजेला विरोध करण्यात आला आहे.

यासंदर्भात आदिवासी एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष जनाठे यांनी पालघरचे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून या रावणपूजेविषयी सावध केले आहे. त्यात नमूद केले आहे की, लंकापती रावणाच्या अंगी असलेल्या चांगल्या गुणांबद्दल आम्हाला कोणतीही शंका नाही. पण भारतातील विशेषतः पालघरमधील आदिवासी हे श्रीरामाला आपले दैवत मानतात. लग्नविधीत राम-राम म्हटल्याशिवाय सुखी संसार सुरू होत नाही. असे अनेक दाखले श्रीरामासंदर्भात देता येतील. त्यामुळे आम्ही सर्व आदिवासी हे श्रीरामाचे वारस आहोत, रावणाचे नाही.

 

हे ही वाचा:

‘कोण जाणे पवारांना कसली वेदना आहे?’

बापरे! कोणी केली धनुष्यबाण घेऊन हत्या?

सर्वाधिक मुले असलेल्या पालकांना मिझोराममध्ये दिले इनाम! कशासाठी ते वाचा…

‘…यालाच म्हणतात सत्तेचा माज!’

 

समाजात भेदभाव निर्माण करणाऱ्या काही संघटना रावणाला आदिवासींचा राजा म्हणवतात. ते चुकीचे आहे. आमच्या रामाचा अपमान करणाऱ्या रावणाचे पूजन या भारतवर्षात कुठेही होता कामा नये. तसेच ते पालघर जिल्ह्यातही ते होऊ देणार नाही. रामाचा अपमान करणाऱ्या रावणाचे पूजन नाही तर दहनच झाले पाहिजे. त्यामुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यात कुठेही रावण पूजन होऊ देऊ नये अशी विनंती आम्ही करत आहोत, अन्यथा तिथे वाद निर्माण होऊ शकतो.

ब्राह्मणगाव मोखाडा येथे आदिवासी राजा महात्मा रावण याच्या महापुजेचे आयोजन १५ ऑक्टोबर म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी करण्यात आले आहे. त्याला हा विरोध करण्यात आला आहे.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,446अनुयायीअनुकरण करा
4,450सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा