क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण थांबवून त्याच्या नावाने भरणाऱ्या ऊरुसावर ताबडतोब बंदी घाला, या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने ११ मार्च रोजी संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी ही घोषणा केली आहे.
औरंगजेबाच्या नावाने भरणाऱ्या उरुसावर बंदी घाला, मजार मोगल सम्राट शहेनशाह हजरत औरंगजेब आलमगीर या नावाचा बोर्ड काडून त्या ठिकाणी क्रूरकर्मा औरंगजेबाचे थडगे या नावाचा चा फलक लावा, या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनाची संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहे, असेही शिंदे म्हणाले.
शिंदे म्हणतात की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा अनन्वित अत्याचार व छळ करून हत्या करणारा क्रूरकर्मा औरंगजेबाच्या थडग्याचे रूपांतर दर्ग्यामध्ये आणि दर्ग्याचे रूपांतर मशिदीमध्ये करण्यात आलेले आहे. मजार मोगल सम्राट शहनशा हजरत औरंगजेब आलमगीर या नावाने बेकायदेशीर उभारलेल्या दर्ग्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात उरूस भरवला जातो. या क्रूरकर्मा औरंगजेबाच्या थडग्यावर मखमली गलब, चादर, फुलांच्या माळा चढवल्या जातात व त्या ठिकाणी नमाज पठण केले जाते.
या उरुसाच्या दिवशी सर्व शासकीय कार्यालयांना व शाळांना सुट्टी दिली जाते. यासर्व गोष्टी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान करणाऱ्या आहेत. या क्रूरकर्मा औरंगजेबाच्या उदात्तीकरणाच्या विरोधात मंगळवार ११ मार्च रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा तारखेप्रमाणे येणारा बलिदान दिवस याच दिवशी हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर औरंगजेबाचे उदात्तीकरण थांबवा या मागणीसाठी निदर्शने करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रशासनाने औरंगजेबाच्या नावाने भरणाऱ्या उरुसावर कायमस्वरूपी बंदी घालावी. शासकीय सुट्टी रद्द करावी. नमाज पढण्यास बंदी करावी. चादर चढवण्यास बंदी करावी. हजरत औरंगजेब नावाच्या फलक हटवून क्रूरक्रमा औरंगजेब नावाचा फलक लावण्यात यावा. अशा मागण्या करण्यात येणार आहेत.
हे ही वाचा:
दलित मुलीचे अपहरण करून अत्याचार, हातावरील ‘ओम’ पुसण्यासाठी ओतले अॅसिड, खायला दिले बीफ!
औरंगजेबाची कबर खोदून अरबी समुद्रात फेकून द्या!
अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये होळी कार्यक्रमाला परवानगी नाकारली
नौदलात सामील होण्यासाठी २,९७२ अग्निवीर सज्ज
या आंदोलनाचे नेतृत्व हिंदूधर्म रक्षक नरवीर पुरस्कार प्राप्त हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे करणार आहेत. यांनी यापूर्वी प्रतापगडाच्या पायथ्याशी मुस्लिम सरदार अफजलखानाच्या थडग्याभोवती झालेले अतिक्रमण आंदोलन करून उद्ध्वस्त केलेला आहे. विशाळगडावरील मुस्लिम सरदार मलिके रेहानच्या थंडग्या वरती झालेल्या इस्लामिक अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यास सरकारला भाग पाडले आहे. आता त्यांचे लक्ष मुस्लिम सरदार क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदातीकरण थांबवणे हे आहे. यासाठी त्यांनी चलो सांभाजीनगर हाक दिलेली आहे.
तरी चलो संभाजीनगरच्या मोहिमेमध्ये शिवभक्त आणि राष्ट्रभक्त आणि सामील व्हावं असे आवाहन सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाटील, दत्तात्रय भोकरे, सांगली शहर अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मिरज शहराध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे, अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार, अविनाश मोहिते, प्रसाद रिसवडे, मनोज साळुंखे, रवी वादवणे, अरुण वाघमोडे, प्रदीप निकम, गजानन मोरे, यांनी केले आहे.