काकांना कामावरून कमी केल्याच्या रागातून बांधकाम साईटवरील सुपरवायझरची हत्या करण्यात आल्याची घटना वरळी जिजामाता नगर येथे बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी वरळी पोलीसानी हत्येचा गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
मोहम्मद शब्बीर अब्बास खान (३८) असे हत्या करण्यात आलेल्या सुपरवायझरचे नाव आहे. मोहम्मद शब्बीर हा वरळीतील जिजामाता नगरातील सुभाष नगरात राहण्यास होता. वरळीतील जिजामाता नगर स्मशानभूमी या ठिकाणी कांबळे नगर येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प सुरु आहे. या ठिकाणी मोह्हमद शब्बीर हे सुपरवायर म्हणून काम करीत होते. या बांधकाम ठिकाणी आरोपी सुधांशु प्रफुल कांबळे (१९) याचे काका काम करीत होते. त्यांना सुपरवायझर मोहम्मद शब्बीर यांनी कामावरून काढून टाकले होते. काकांना कामावरून काढून टाकल्याचा रागातून सुधांशु याने साहिल श्याम मराठी (१८) आणि १७ वर्षाचा एक आरोपी या तिघांनी मोहम्मद शब्बीर यांना बुधवारी रात्री वरळीतील जिजामाता नगर स्मशानभूमीच्या पाठीमागे, कांबळे नगर येथे गाठून शब्बीर याला चाकूने भोसकून हत्या केली.
हे ही वाचा:
औरंगजेबाची कबर खोदून अरबी समुद्रात फेकून द्या!
औरंगजेबाच्या नावाने होणारा उरुस ताबडतोब बंद करा…थडग्याचा फलक लावा!
अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये होळी कार्यक्रमाला परवानगी नाकारली
दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरले ‘चोकर्स’
या घटनेची माहिती मिळताच वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी मोह्हमद शब्बीर यांना जखमी अवस्थेत नायर रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले आहे. याप्रकरणी वरळी पोलीआणि हत्येचा गुन्हा दाखल करून सुधांशूसह तिघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी बीडीडी चाळ आणि आग्रीपाडा येथे राहणारे आहेत.