फेरीवाल्याकडून हप्तावसुली करणाऱ्या धारावी पोलीस ठाण्यातील चार पोलीस अंमलदाराना निलंबित करण्यात आले आहे.
पोलिस फेरीवाल्याकडून हप्ता वसूल करीत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर या व्हीडीओची दखल पोलीस उपायुक्त यांनी घेऊन निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
निलंबित करण्यात आलेल्यामध्ये बिट मार्शल आणि पेट्रोलिंग व्हॅनमधील अंमलदार यांचा समावेश आहे. निलंबनाचे आदेश २८ फेब्रुवारी रोजी काढण्यात आला आहे. धारावी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना या हप्ता वसुलीमध्ये दोषी ठरवून त्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकाकडून करण्यात येत आहे.
महेंद्र पुजारी, काशीनाथ गाजरे, गंगाधर खरात आणि अप्पासाहेब वाकचौरे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अमलदारांची नावे आहेत, हे चोघे धारावी पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
धारावी परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर धंदे,फेरीवाले आणि बेकायदेशीर कृत्य सुरू असून देखील याकडे स्थानिक पोलीस ठाण्याचे नेहमी दुर्लक्ष राहिले आहे. बेकायदेशीर धंद्यामुळे या परिसरात गुन्हेगारी कृत्य मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.
या परिसरात बेकायदेशीर फेरीवाले आणि धंदे करणाऱ्याची संख्या मोठी असल्यामुळे वाहतूक कोंडी, तसेच पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या बेकायदेशीर फेरीवाले यांच्याकडून स्थानिक पोलीस ठाण्यांना मोठ्या प्रमाणात हप्ता दिला जात असल्याची चर्चा होती.
ही चर्चा एका व्हायरल व्हिडीओमुळे प्रत्यक्षात समोर आली आहे.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये धारावी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार, बीट मार्शल पेट्रोल व्हॅन वरील अंमलदार फेरीवाले आणि बेकायदेशीर धंदेवाल्याकडून हप्ता घेताना कैद झाले आहे.
हे ही वाचा:
औरंगजेबाची कबर खोदून अरबी समुद्रात फेकून द्या!
१०६ बळी घेणाऱ्या पक्षाच्या मांडीवर बसल्याबद्दल ठाकरेंनी हुतात्मा चौकात माफी मागावी!
उद्धव ठाकरे, चिता कॅंपची भाषा कोणती?
दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरले ‘चोकर्स’
हा व्हिडीओ डिसेंबर २०२४ मध्ये काढण्यात आला असून या व्हिडीओ मध्ये स्पष्टपणे हप्ता वसुली करताना धारावी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार स्पष्टपणे दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये हे स्पष्ट होत आहे की चार पोलिस अंमलदार फेरीवाले यांच्या विरुद्ध कारवाई टाळण्यासाठी लाच घेत होते,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
चार पोलिसां विरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती,अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक चौकशीत असे आढळून आले की चारही पोलीस अंमलदार दोषी आढळून आले असून त्यांना निलंबित करण्यात आले.
निलंबनाच्या आदेशात असे म्हटले आहे: “धारावी पोलिस ठाण्यात बीट मार्शल आणि मोबाईल वाहन कर्मचारी म्हणून काम करताना दिसणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला होता. ज्यामध्ये कायदेशीर कारवाई करण्याऐवजी फेरीवाले आणि स्टॉल मालकांकडून लाच घेताना दिसत आहे. प्रसारित व्हिडिओमधील कृतींमुळे लोकांमध्ये मुंबई पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे. अधिकाऱ्याने असेही सांगितले की, चारही पोलिसांविरुद्ध सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली आहे, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.