देशात बांगलादेशीच्या घुसखोरीची चर्चा जास्त आणि उपाय कमी असे चित्र दिसते आहे. भारत-बांगलादेश सीमेवर जिथे नद्यांचे प्रवाह आहेत, तिथून ही घुसखोरी सुरू आहे. ही घुसखोरी कशी होते, कोणाच्या मदतीने होते, याचा तपशील आता सुरक्षा यंत्रणांकडे असल्यामुळे या समस्येवर आता जमालगोटा उपाय सुरू झालेले आहेत. घुसखोरीला हातभार लावणारे अधिकारी आता तपास प्रक्रीयेमध्ये रगडले जातायत. कारवाईच्या भीतीने काही अधिकारी फरार झाल्याचे वृत्त आहे.