31 C
Mumbai
Monday, October 2, 2023
घरधर्म संस्कृतीमहाराष्ट्रातील भाविकांसाठी अयोध्येत भक्त निवास ?

महाराष्ट्रातील भाविकांसाठी अयोध्येत भक्त निवास ?

विधानसभा अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर यांनी लिहिले एकनाथ शिंदेंना पत्र

Google News Follow

Related

विधानसभा अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून महाराष्ट्रातून जाणाऱ्या रामभक्तांसाठी रामजन्मभूमी अयोध्येत भक्त निवास बांधण्याची मागणी केली आहे.

आपल्या पत्रात विधानसभा अध्यक्षांनी म्हटले आहे की, केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात करोडो भाविकांचे तीर्थक्षेत्र असलेल्या अयोध्येतील भगवान श्री राम मंदिराच्या भव्य पुनर्निर्माणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. श्री रामजन्मभूमीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील भाविकही मोठ्या संख्येने अयोध्येत येतात. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या राहण्यासाठी या मंदिराजवळ भक्त निवास/अतिथीगृह बांधल्यास सर्वांना सोयीचे होईल. याबाबत आपण पुढाकार घेऊन उत्तर प्रदेश सरकारकडून भूखंड मागवावा आणि भाविकांच्या सोयीसाठी भक्ती निवास/अतिथीगृह बांधावे. महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या भाविकांसाठी सर्व सुविधांनी सज्ज असा भक्त निवास बांधण्यात यावा, अशी अपेक्षा विधानसभा अध्यक्षांनी पत्रात व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

रणजित सावरकर राहुल गांधींविरोधात तक्रार करणार

गॅस सिलिंडर चोरीविरोधात सरकारचा आता ‘कोड’वर्ड

‘राहुल गांधी हा मनोरुग्ण, सावरकर समजण्याइतकी अक्कल या माणसामध्ये नाही’

धारावीत बाळासाहेब ठाकरे दवाखाना

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे या बाबतीत अत्यंत सकारात्मक असल्याचे समजते. आपण यासंदर्भात तातडीने पावले उचलून महाराष्ट्रातून अयोध्येत जाणाच्या भाविकांसाठी सर्व सुविधांनी युक्त अशा अतिथी सदनाच्या उभारणीबाबत तातडीने कार्यवाही करावी. जेणेकरून सर्व भाविकांना निवास व अन्य व्यवस्था उपलब्ध करून देता येतील, असे नार्वेकर यांनी पत्रात म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
102,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा