आल्याचा वापर जवळजवळ प्रत्येक घरात केला जातो. आल्यामुळे चहा आणि अन्नाची चव वाढतेच, पण त्याचबरोबर शरीराला उबदार ठेवण्याचेही काम ते करते. आयुर्वेदात आल्याला औषधी गुणधर्म असलेले मानले गेले आहे. विशेष म्हणजे, आल्याचे पाणी शरीरासाठी किती फायदेशीर आहे, याची कल्पना अनेकांना नसते. विशेषतः हिवाळ्यात आल्याचे पाणी अनेक आजारांपासून बचाव करण्यास मदत करते.
आल्याची चव तिखट, कडू आणि काहीवेळा किंचित तुरटही असते. त्यामुळे त्याचे सेवन काही पदार्थ मिसळून केले तर अधिक फायदेशीर ठरते. आल्याचे पाणी खोकला, सर्दी-जुकाम, बद्धकोष्ठता आणि सांधेदुखी यांसारख्या समस्यांवर आराम देते. पण त्याचे सेवन योग्य पद्धतीने करणे महत्त्वाचे आहे. विविध समस्यांनुसार आल्याच्या पाण्यात वेगवेगळ्या वस्तू मिसळून घ्याव्या लागतात. जर पचनाशी संबंधित त्रास असेल तर आले पाण्यात उकळून त्यात सेंधव मीठ आणि काही थेंब लिंबाचा रस मिसळून सेवन करावे. हे मिश्रण जेवणाच्या साधारण एक तास आधी घ्यावे.
हेही वाचा..
भारतीय सैन्याचा ‘त्रिशूल’ आणि हाफिज सईद घाबरला; लाहोरमध्ये होणारी परिषद पुढे ढकलली
महाआघाडी सत्तेत आल्यास एकाहून अधिक उपमुख्यमंत्री असतील, ज्यात एक मुस्लिम असेल
आदिवासी वीर नायकांच्या जीवनकथा, लढायांचे आता डिजिटल दर्शन
बनावट इतिहासातून शनिवारवाड्यावर अतिक्रमण
सर्दी-खोकल्यासाठी आले अत्यंत लाभदायक आहे. आल्याच्या पाण्याचे सेवन केल्याने जुनाट कफ बाहेर पडतो आणि खोकल्यात आराम मिळतो. यासाठी गारम आल्याच्या पाण्यात मध मिसळून घ्यावे किंवा आले, काळी मिरी आणि तुळस घालून काढा तयार करून प्यावा. हे मिश्रण सर्दी-खोकला एवढेच नव्हे तर तापामध्येही आराम देते. कधी कधी कमी खाल्ल्यानंतरही वजन वाढत जाते, विशेषतः महिलांमध्ये ही समस्या अधिक दिसते. अशावेळी सकाळी रिकाम्या पोटी आले पाण्यात उकळून त्यात लिंबू मिसळून घ्यावे. यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
जर डोकेदुखीचा त्रास होत असेल किंवा नीट झोप येत नसेल, तर आल्याचे पाणी औषधासारखे काम करते. आले शरीर आणि मन दोन्ही शांत करते, डोकेदुखी व अंगदुखीवर आराम देते. आल्याचे सेवन केल्याने मेंदूमध्ये ऑक्सिजनचा प्रवाह सुधारतो आणि झोप आणणारा हार्मोन मेलाटोनिन याचे उत्पादन संतुलित होते. त्यामुळे झोपेची गुणवत्ता वाढते आणि शरीराला नैसर्गिक विश्रांती मिळते.







