केंद्रीय कामगार व रोजगार तसेच युवक कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी शनिवारी सांगितले की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (ईपीएफओ) ने देशात सामाजिक सुरक्षेचा व्याप वाढवण्यात लक्षणीय योगदान दिले आहे. हे वक्तव्य त्यांनी ईपीएफओच्या ७३ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. केंद्रीय मंत्री मांडविया यांनी सोशल मीडियावर (एक्स) लिहिले, “आज मी ईपीएफओच्या ७३ व्या स्थापना दिन कार्यक्रमात सहभागी झालो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ईपीएफओने देशातील सामाजिक सुरक्षेचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. मी कार्यक्रमात म्हटले की सदस्यांचे समाधान हेच ईपीएफओचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे.”
मांडविया यांनी उपस्थितांना संबोधित करताना देशातील कामगारांच्या सामाजिक आणि आर्थिक कल्याणाच्या दृष्टीने ईपीएफओच्या ऐतिहासिक भूमिकेचे कौतुक केले. त्यांनी संस्थेला आवाहन केले की नागरिक-केंद्रित सेवा वितरणावर नवीन उद्दिष्टे आणि दूरदृष्टीने लक्ष केंद्रित करावे. ते म्हणाले, “ईपीएफओ हा केवळ निधी नाही, तर तो देशातील कामगार वर्गाच्या सामाजिक सुरक्षेवरील विश्वासाचे प्रतीक आहे. या स्थापना दिनाच्या निमित्ताने सर्व अधिकाऱ्यांना नवी प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल आणि आगामी काळासाठी एक स्पष्ट दृष्टिकोन तयार करण्यास प्रोत्साहन मिळेल. ही दृष्टी ईपीएफओच्या ‘संकल्प ते सिद्धी’ प्रवासाला दिशा देईल.”
हेही वाचा..
बाराबंकीत धर्मपरिवर्तनानंतर दाम्पत्याची ‘घरवापसी’; मंदिरात पुन्हा हिंदू रीतीने विवाह!
भारतीय सैन्याचा ‘त्रिशूल’ आणि हाफिज सईद घाबरला; लाहोरमध्ये होणारी परिषद पुढे ढकलली
महाआघाडी सत्तेत आल्यास एकाहून अधिक उपमुख्यमंत्री असतील, ज्यात एक मुस्लिम असेल
आदिवासी वीर नायकांच्या जीवनकथा, लढायांचे आता डिजिटल दर्शन
केंद्रीय मंत्र्यांनी पुढे सांगितले, “ईपीएफओने सेवा वितरणामध्ये पारदर्शकता, वेग आणि संवेदनशीलता सुनिश्चित करून नागरिकांचा विश्वास अधिक दृढ ठेवला पाहिजे.” ते म्हणाले की, “विकसित भारत २०४७” च्या दिशेने जाताना सामाजिक सुरक्षेच्या क्षेत्रात जागतिक दर्जाचे मानक निर्माण करणे आवश्यक आहे. या प्रसंगी केंद्रीय मंत्र्यांनी ‘कर्मचारी नोंदणी योजना २०२५ या योजनेचेही लोकार्पण केले. १ नोव्हेंबर २०२५ पासून लागू होणाऱ्या या योजनेचा उद्देश नियोक्त्यांना पात्र कर्मचाऱ्यांची स्वेच्छेने नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. कार्यक्रमात उपस्थित कामगार व रोजगार सचिव वंदना गुरनानी यांनी ईपीएफओने एका ‘अनुपालन-आधारित’ संस्थेतून नागरिक-केंद्रित संस्थेमध्ये झालेल्या बदलाचे कौतुक केले “प्रत्येक फाईलच्या मागे एक समर्पित कर्मचारी, एक कुटुंब आणि एक स्वप्न दडलेले असते. प्रत्येक कर्मचाऱ्याशी आदर आणि सन्मानाने वागले पाहिजे, कारण सामाजिक सुरक्षा ही केवळ प्रशासकीय व्यवस्था नाही, तर ती माणसांशी निगडित आहे, असेही त्या म्हणाल्या.







