अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी गावच्या ग्राम पंचायतीने तब्बल ७०० वर्षांची परंपरा असणाऱ्या श्री क्षेत्र कानिफनाथ देवस्थान यात्रेत धर्मांध मुस्लिम व्यापाऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे. यानंतर महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून या निर्णयाचे स्वागत करत निर्णय घेणाऱ्या मढी ग्रामस्थांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी म्हटले आहे की, अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी गावच्या ग्रामपंचायतीने देवस्थानच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना दुकाने मांडण्यास प्रतिबंध लावला आहे. मुस्लिम दुकानदार मंदिराच्या प्रथा परंपरांचे पालन करत नाहीत, त्यांची मुजोरी असते अशा अनेक तक्रारी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केल्या होत्या. यामुळे सर्वानुमते ठराव करून हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे मंदिर महासंघाच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करत असून ग्रामपंचायतीच्या निर्णयाचे समर्थन करत आहोत.
पुढे ते म्हणाले की, मुस्लिम व्यापारी स्टॅम्प पेपरवर लिहून देणार आहेत का, की या देवाला आम्ही मानतो, प्रसाद खातो, हिंदू परंपरांना मानतो. असे असल्यास त्याचा विचार केला जाईल अन्यथा मढी ग्रामपंचायतीचा निर्णय स्वागतार्ह आहे. मढी ग्रामपंचायतीच्या निर्णयाचा आदर्श देशभरातील देवस्थानांनी घ्यावा, असं आवाहनही सुनील घनवट यांनी केले.
देवस्थान यात्रेच्या वेळी ग्रामस्थ आणि भाविक ज्या परंपरांचे पालन करतात, त्या परंपरा पायदळी तुडवणे, धार्मिक यात्रेत जुगार- सट्टा असे अवैध धंदे करणे, महिला भाविकांची छेड काढणे, भाविकांना मारहाण करणे, असे गैरप्रकार हे मुजोर धर्मांध व्यावसायिक गेली अनेक वर्षे करत असल्याच्या तक्रारी भाविकांनी केल्या होत्या.
मढी गावात कानिफनाथ महाराजांची यात्रा भरते. होळी पासून गुढीपाडव्यापर्यंत ही यात्रा सुरू असते. हा कालावधी मढीच्या ग्रामस्थांच्या दृष्टीने दुखवट्याचा असतो. या काळात ग्रामस्थ तेलकट पदार्थ तळणे, लग्न कार्य, शेतीकामे, प्रवास अशा प्रकारची कामे पूर्णपणे बंद करतात. शिवाय घरातील पलंग, खाटेवर बसणे टाळतात. परंतु, यात्रेला येणारे मुस्लीम व्यापारी या प्रथा पाळत नाहीत, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे यात्रेदरम्यान येणाऱ्या मुस्लीम व्यापाऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरपंच संजय मरकड यांनी सांगितले.
हे ही वाचा :
पवार साहेब तुम्ही तरी स्वाभिमानाच्या बाता करू नका
पहिला ‘छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत’ पुरस्कार ‘अनादी मी अनंत मी’ गीताला
महाकुंभ समारोपाला महाशिवरात्रीचा योग!
काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा!
अनेक राज्यांत अनुभवायला आले आहे की, बर्याच मंदिर परिसरांत फुलवाले धर्मांध मुसलमान असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ समोर येतात की, थूक जिहाद करून अर्थात् फुले- फळे यांना थुंकी लावून त्याची भक्तांना विक्री केली जाते. धर्मांधांची थुंकी लागलेली फळे- फुले देवतांना वाहिली जातात, तसेच काही वेळा त्याच फुलांचा हार देवतेच्या गळ्यात घातला जातो. धर्मांध हे एक ‘अजेंडा’ म्हणजे नियोजित षडयंत्र रचून कार्य करत आहेत. बऱ्याच ठिकाणी स्वतःची ओळख लपवून, वेळप्रसंगी खोटी ओळख दाखवून ते भाविकांची लूट करतात, असे अनेक गैरप्रकार देश पातळीवर अनेक ठिकाणी घडत आहेत.