26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरधर्म संस्कृतीश्री क्षेत्र भीमाशंकरला जोडणाऱ्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा

श्री क्षेत्र भीमाशंकरला जोडणाऱ्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा

Related

महाराष्ट्रातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर येथे देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी व पर्यटकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने या तीर्थक्षेत्रास जोडणाऱ्या खेड – भीमाशंकर या राज्य मार्ग रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे.

एकूण ७० किमी लांबीच्या या महामार्गामुळे राजगुरूनगर (खेड), चास, वाडा, तळेघर ही काही महत्त्वाची शहरे जोडली जाणार असून या महामार्गामुळे भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांसाठी दळणवळण सोयीचे होईल. भीमाशंकर व माळशेज घाट हे पर्यटन वर्तुळ शक्य होईल, तसेच भीमाशंकर परिसरातील शेतीमाल मुंबई बंदराकडे पोहोचवणे सुलभ होईल. या महामार्गामुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होईल व परिसराचा शैक्षणिक व औद्योगिक विकास साधण्यास मदत होईल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवर माहिती देताना म्हटले आहे.

सदर महामार्गामुळे या परिसरातील पर्यटन, शैक्षणिक, विशेष आर्थिक क्षेत्राचा विकास हा ऐतिहासिक वारसा जगाच्या पटलावर पोहोचवण्यास मदत होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकुशल नेतृत्वाखाली देशभरात सर्वदूर राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विणून देशातील तीर्थक्षेत्रांचा व पर्यटन क्षेत्रांचा विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही गडकरी यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

“सभागृह म्हणजे लोकशाहीचं तीर्थक्षेत्र”

भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी सुल्ताना खान यांच्यावर हल्ला

अमेरिकेतील इंडियाना स्टेट मॉलमधल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू

१६व्या राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान

खुलताबाद-घृष्णेश्वर-एलोरा राज्य महामार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर या तीर्थस्थळी येणाऱ्या भाविकांच्या व पर्यटकांच्या सुविधेसाठी खुलताबाद-घृष्णेश्वर-एलोरा या राज्य महामार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. या एकूण ६ किमी लांबीच्या महामार्गामुळे देश विदेशातून जगप्रसिध्द वेरुळ लेणी व अजिंठा लेणी ऐतिहासिक वारसा असलेले घृष्णेश्वर मंदिर व मंदिरापासून जवळच असलल्या एलोरा-अजिंठा लेण्यांची प्रसिद्ध गुहा या स्थळापर्यंत पर्यटकांना पोहोचवणे सुलभ होणार आहे. छत्रपती संभाजीनगर व अजिंठा ही दोन महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत.

दोन ज्योतिर्लिंग आता राष्ट्रीय महामार्गावर

भारताच्या विविध भागात १२ ज्योतिर्लिंग आहेत. या ज्योतिर्लिंगांपैकी पाच महत्वाची ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. यातील दोन ज्योतिर्लिंग आता राष्ट्रीय महामार्गावर आणण्यात आली आहेत.

महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग 

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. तर आता राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात येणारे खेड- भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात आहे. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि औरंगाबाद जिल्ह्यामधील खुलताबाद तालुक्यातील वेरुळ येथे ज्योतिर्लिंग आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,919चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
14,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा