33 C
Mumbai
Thursday, May 16, 2024
घरधर्म संस्कृतीइस्लामी कट्टरतावादाविरुद्ध श्रीलंकेचे दमदार पाऊल

इस्लामी कट्टरतावादाविरुद्ध श्रीलंकेचे दमदार पाऊल

Google News Follow

Related

श्रीलंका लवकरच बुरखा आणि मदरसे बंद करणार आहे अशी माहिती श्रीलंका सरकारमधील एका मंत्र्याने दिली. कट्टरतावादाला आळा घालण्यासाठी, आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.

सार्वजनिक सुरक्षा मंत्री सरथ वीरसेकरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून मुस्लिम स्त्रियांसाठी संपूर्ण बुरखा बंदी करण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली आहे. आमच्या सुरूवातीच्या काळात मुस्लिम स्त्रिया बुरखा वापरत नव्हत्या. हे देशातील कट्टरतावाद वाढल्याचे लक्षण आहे. आम्ही यावर नक्कीच निर्बंध लादणार आहोत.

श्रीलंकेत यापूर्वी २०१९ मध्ये देखील बुरखा बंदी करण्यात आली होती. ख्रिश्चन चर्च आणि होस्टेलमध्ये इस्लामी दहशतवाद्यांनी बाँबस्फोट घडवून आणल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले होते. या हल्ल्यात सुमारे २५० नागरिकांचे प्राण गेले होते.

हे ही वाचा:

सचिन वाझेंना अडकवणारे अधिकारी कोण?

“लव्ह जिहाद हा केरळला इस्लामिक राज्य बनवण्याच्या षडयंत्राचा भाग”

“इस्लाम किंवा ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या दलितांना आरक्षणाचा फायदा मिळणार नाही.” – केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

यानंतर गोटाबाया राजपक्षा यांची कट्टरतावादावर कडक प्रहार करण्याच्या आश्वासनामुळे राष्ट्रपती म्हणून निवड झाली. यापूर्वी त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून देशाच्या उत्तरेकडून होत असलेली घुसखोरी बराच काळ थांबवण्यासाठी ते प्रसिद्ध होते. मात्र राजपक्षा यांच्यावर विविध मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याचे आरोप देखील करण्यात आला होता, परंतु त्यांनी हा आरोप सातत्याने फेटाळून लावला आहे.

वीरसेकरा यांनी अजून माहिती दिली की, लवकरच देशातील मदरसे देखील बंद करण्यात येणार आहेत. “कोणीही कुठेही शाळा उघडून तुम्हाला हवे ते मुलांना शिकवू शकत नाही” असे ते म्हणाले. वीरसेकरा यांनी असे देखील सांगितले की, ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांना धुडकावून लावत आहेत.

हे ही वाचा:

धार्मिक कट्टरतावादावर फ्रान्सचा पलटवार

इस्लामी कट्टरतेच्या विरोधात स्वित्झरलँडचे महत्वाचे पाऊल

धार्मिक स्थळांच्या नावाखाली अतिक्रमण करणाऱ्यांवर योगींचा दणका

जगात विविध देशांमध्ये इस्लामी कट्टरतावादाच्या विरोधात आवाज उठताना दिसत आहे. फ्रान्सने देखील चार्ली हेब्दो, सॅम्युएल पॅटी यांसारख्या प्रसंगांतून धडा घेऊन इस्लामी कट्टरतावादावर प्रहार करायला सुरूवात केली आहे. काहीच काळापूर्वी स्वीत्झरलँडने देखील बुरखा बंदीचा कायदा मंजूर केला आहे. त्यांच्याबरोबरच त्यांचे शेजारी असलेल्या ऑस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया आणि डेन्मार्क या देशांनी देखील बुरखा बंदी केली आहे. युरोपमधील काही देशांत अंशतः बंदी लागू आहे. उदा. काही देशांत सार्वजनिक ठिकाणी बुरखा वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. आता या देशांत श्रीलंकेची देखील भर पडली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा