भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना पाकिस्तानला इशारा दिला की, दहशतवाद विरोधी कारवाई थांबलेली नाही तर ती स्थगित केली आहे. मोदी पाकिस्तानचे प्रत्येक पाऊल आम्ही पाहू, त्याप्रमाणे भूमिका घेऊ.
मोदी म्हणाले, भारताचे हवाई दल, सेनादल, नौदल, सीमा सुरक्षा दल, निमलष्करी दल सातत्याने अलर्टवर आहेत. सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइकनंतर आता ऑपरेशन सिंदूर ही दहशतवाद विरोधी मोहीम ही भारताची नीती आहे. ऑपरेशन सिंदूरने दहशतवादविरोधातील लढाईची नवी मर्यादारेषा तयार केली आहे. न्यू नॉर्मल तयार केला आहे.
त्याअंतर्गत भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर त्याचे जबरदस्त उत्तर दिले जाईल. आपल्या अटींवर हे उत्तर असेल. दहशतवादाच्या त्या प्रत्येक जागी जाऊन त्याच्या मुळावर घाव घालू.
मोदींनी सांगितले की, अण्वस्त्रांच्या नावावर ब्लॅकमेल सहन केले जाणार नाही. त्याच्या आड लपून दहशतवादी कारवाया करणाऱ्यांवर निर्णायक प्रहार करू. आणि दहशतवादाला पाठिंबा देणारे सरकार, दहशतवादाचे आका यांना वेगवेगळे पाहणार नाही. ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान जगाने पाकिस्तानचा तो चेहरा पाहिला आहे. मारल्या गेलेल्या अतिरेक्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानी अधिकारी तिथे आले. हे सरकार पुरस्कृत दहशतवादाचे रूप आहे. आपल्या नागरिकांना वाचविण्यासाठी सातत्याने निर्णायक पावले उचलत राहू.
हे ही वाचा:
चीनने लष्करी साहित्यासह मालवाहू विमान पाकिस्तानला पाठवले?
काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्याकडून ऑपरेशन सिंदूरवर प्रश्नचिन्ह
तुर्कस्तानचा निषेध: पुण्यातील व्यापाऱ्यांचा सफरचंदावर बहिष्कार!
नक्षलवाद्यांच्या आयईडी स्फोटात जवान जखमी
मोदी म्हणाले, युद्धाच्या मैदानात आम्ही नेहमी पाकिस्तानला धूळ चारली आहे. पण यावेळी ऑपरेशन सिंदूरने नवा आयाम जोडला आहे. आम्ही वाळवंटात, पर्वतांवर शानदार प्रदर्शन केले आहे. नव्या युद्धनीतीत आपली श्रेष्ठता सिद्ध केली. या ऑपरेशन दरम्यान मेड इन इंडिया शस्त्रांची प्रामाणिकता सिद्ध झाली. २१व्या शतकात मेड इन इंडिया शस्त्रांना किंमत आली आहे.
मोदींनी आवाहन केले की, प्रत्येक दहशतवादाविरोधात आपण सगळ्यांनी एकजूट ठेवणे ही आपली शक्ती आहे. निश्चितपणे हे युग युद्धाचे नाही. पण पण हे युग दहशतवादाचेही नाही. दहशतवादाविरोधात झीरो टॉलरन्स ही चांगल्या जगाची गॅरंटी आहे.
पाकिस्तानी सैन्य, पाकिस्तान सरकार, ज्यापद्धतीने दहशतवादाला खतपाणी घालत आहे, ते एकदिवशी पाकिस्तानला समाप्त करेल. पाकिस्तानला जर शिल्लक राहायचे असेल तर आपल्या दहशतवादाची केंद्र उद्ध्वस्त करावी लागतील. याव्यतिरिक्त कोणतही शांततेचा मार्ग नाही.
मोदी स्पष्टपणे म्हणाले की, भारताचे मत अगदी स्पष्ट आहे. टेरर आणि टॉक एकत्र होणार नाही. टेरर आणि ट्रेड एकत्र होणार नाही. पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही.
मी विश्वसमुदायाला सांगेन की, आमची नीती आहे की, पाकिस्तानशी चर्चा होईल ती दहशतवादाबद्दल होईल. पाकव्याप्त काश्मीरबद्दलच बोलणे होईल.
मोदींनी सांगितले, आज बुद्ध पौर्णिमा आहे. भगवान बुद्धनी आम्हाला शांतीचा मार्ग दाखविला आहे. शांतीचा मार्गपण शक्तीकडूनच जातो. मानवता शांती व समृद्धीकडे जाण्यासाठी प्रत्येक भारतीय शांततेने जगेल. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करेल यासाठी भारताचे शक्तिशाली होणे आवश्यक आहे. आवशयकता असताना या शक्तीचा उपयोग व्हायला हवा आहे. भारताने हेच केले आहे. मी पुन्हा एकदा भारतीय सेना आणि सशस्त्र दलांना सॅल्युट करतो. भारतीयांचा आत्मविश्वास, एकजूट याला मी नमन करतो.







