26 C
Mumbai
Tuesday, September 28, 2021
घरराजकारणमुख्यमंत्र्यांनी ताबापत्र दिले; मग दिव्यांगांची घरे गेली कुणीकडे?

मुख्यमंत्र्यांनी ताबापत्र दिले; मग दिव्यांगांची घरे गेली कुणीकडे?

Related

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दीड वर्षापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात दिव्यांगाना बीएसयूपी योजनेतून परवडणाऱ्या घरांच्या चाव्या व ताबापत्र अगदी थाटामाटात दिले खरे पण अजूनही ती घरे त्यांच्या ताब्यात काही देण्यात आलेली नाही. त्यामुळे दिव्यांगांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

८ सप्टेंबरला बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटना संचालित अखिल भारतीय दिव्यांग सेनेच्या वतीने ठाणे महानगरपालिका मुख्यालयात प्रवेश करून कायदेभंग आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ताबापत्र देण्यात आल्यानंतर काही मोजक्या लोकांना ताबा मिळाला पण बहुतांश लोकांना अद्याप ही घरे ताब्यात मिळालेली नाहीत. आता बीएसयूपी आणि स्थावर मालमत्ता विभाग चालढकल करत असल्याचे समोर येते आहे. माहिती अधिकारातून जी माहिती समोर आली आहे, त्यानुसार दिवा, तुळशीधाम, कासारवडवली, ब्रह्मांड, रिव्हरवूड येथील घरांचा प्रत्यक्ष ताबा देण्यात आलेला नाही.

६ फेब्रुवारी २०२०ला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात या घरांच्या चाव्या देण्यात आल्या. पण घरे अद्याप ताब्यात आलेली नाहीत. नाट्यगृहात चाव्या देण्याचे हे नाटक होते का, असा सवालही दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.

या घरांचा ताबा मिळावा यासाठी १२ जुलै रोजी दिव्यांगांना पालिका मुख्यालयासमोर भर पावसात आंदोलन करण्याची वेळ ओढवली. त्यावेळी प्रश्न सुटेल असे आश्वासन देत दिव्यांगांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. त्यामुळे आता पुन्हा आंदोलन करून पालिका मुख्यालयातच धडक मारण्याचे ठरविले आहे.

हे ही वाचा:

ट्रिपल सीट दुचाकीस्वारांची गर्दी वाढली

‘पेंग्विन म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी’

…आणि असे झाले ३० कोटींचे ‘बेस्ट’ नुकसान

समोरच्यांवर बोलण्यापेक्षा आपल्या पक्षातल्या लोकांना आधी शिकवावं

यासंदर्भात भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे की, दीड वर्षापूर्वी सोडत काढून पात्र दिव्यांगांना ठाणे महापालिकेतर्फे ताबापत्र व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते थाटामाटात फेब्रुवारी २०२० मध्ये घराच्या चाव्या ही देण्यात आल्या. आजतागायत त्या घरांचा पत्ता नाही. ही क्रूर चेष्टा नाही तर दुसरे काय आहे?

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,414अनुयायीअनुकरण करा
3,610सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा