33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरराजकारणमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा जाणार गुवाहटीला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा जाणार गुवाहटीला

आमदार गुवाहाटीला जाणार असल्याचं म्हटलं जातं आहे.

Google News Follow

Related

महाराष्ट्राच्या राजकारणात गुवाहाटीचे महत्च वेगळेच आहे. चार महिन्यांपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळी शिंदे गट सुरतमार्गे गुवाहाटीला रवाना झाले होते. त्यानंतर राज्यात महाविकास आघडीचे सरकार कोसळले आणि शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यानंतर आता मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे ४० आमदारांसोबत पुन्हा गुवाहाटीचा दौरा करणार असल्याची माहिती आहे.

गुवाहाटीतील स्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी शिंदे गटाचे काही नेते गुवाहाटीला गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील सर्व आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढच्या आठवड्यात गुवाहाटीला जाण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.

या दौऱ्यात ते कामाख्या देवीचं दर्शन घेणार असून ज्या लोकांनी अथवा नेत्यांनी एकनाथ शिंदे आणि आमदारांना बंडावेळी गुवाहाटीत मदत केली होती, त्यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार मानतील, अशी माहिती आहे. त्यात आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा, आसामचे राज्यपाल, गुवाहाटीचे पोलीस अधिक्षक आणि इतर काही महत्त्वाच्या नेत्यांची मुख्यमंत्री शिंदे भेट घेण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

लवकरच भारतात होणार ‘ट्विटर ब्लू टिक’ लाँच, मस्क यांची पुष्टी

‘तर उद्धव ठाकरेंनी महापौर बंगल्याची किंमत सरकारकडे जमा करावी’

‘उद्धव ठाकरेंनी केलेल्या बेईमानीचा बदला घेतला’

सोनाली फोगट हत्या प्रकरणात रेस्टॉरंटचा मालक अटकेत

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बाळासाहेबांची शिवसेना नेते उत्तर प्रदेशमधील अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता हे आमदार गुवाहाटीला जाणार असल्याचं म्हटलं जातं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामाख्या देवीचे भक्त आहेत. त्यामुळेच मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामाख्या देवीला साकडं घालण्यासाठी शिंदे आपल्या आमदारांसह गुवाहाटीला जाणार असल्याचे म्हटले जातं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा