26 C
Mumbai
Wednesday, November 30, 2022
घरराजकारण'उद्धव ठाकरेंनी केलेल्या बेईमानीचा बदला घेतला'

‘उद्धव ठाकरेंनी केलेल्या बेईमानीचा बदला घेतला’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले परखड विधान

Google News Follow

Related

अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे जे सरकार स्थापन झाले आणि ते स्थापन करताना शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी ज्यांच्यावर प्रचारादरम्यान टीका केली त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्द्यावर सडेतोड भाष्य करत उद्धव ठाकरेंना आपण जशास तसे उत्तर दिल्याचे ते म्हणाले. इंडिया टुडेच्या कार्यक्रमात त्यांनी मुलाखतीदरम्यान आपले परखड मत व्यक्त केले.

फडणवीस म्हणाले की, ज्या प्रकारे आमच्याशी वर्तणूक झाली. जी बेईमानी आमच्याशी केली गेली. हा शब्द मी वापरत आहे. बेईमानी झाली आमच्याशी. शिवसेनेने ती केली. माझ्या पाठीत आणि भाजपाच्या पाठीत खंजिर खुपसला. त्यामुळे आम्ही संधी शोधतच होतो. आम्ही इथे तपस्या करण्यासाठी, साधू संत बनण्यासाठी आलेलो नाही. त्यामुळे आम्ही त्याचे उत्तर देणारच होतो. याचे क्रेडिट उद्धव ठाकरेंना द्यावे लागेल. उद्धव ठाकरे आणि आदित्. ठआकरे यांनी एकनाथ शिंदेंना जी वागणूक दिली त्यामुळे त्यांनी पक्षातून बाहेर पडणअयाचा निर्णय घेतला. त्यामुळे जर एखाद्याने पक्षात बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असेल तर आम्ही त्यांना असे तर सांगणार नाही की एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसोबत जावे. आम्हाला बदला तर घ्यायचाच होता, त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदेंचे स्वागतच केले. आम्ही त्यांना साथ दिली. आम्ही १०० टक्के हे केले. मला याचा आनंद आहे. जी बेईमानी माझ्यासोबत झाली त्याचा बदला आम्ही घेतला.

हे ही वाचा:

सोनाली फोगट हत्या प्रकरणात रेस्टॉरंटचा मालक अटकेत

दहशतवादी अबू हंजलाला अटक

‘तर उद्धव ठाकरेंनी महापौर बंगल्याची किंमत सरकारकडे जमा करावी’

श्रीलंकेचा फलंदाज दानुष्काला बलात्काराच्या आरोपात अटक

 

अडीच वर्षापूर्वी शिवसेना आणि भाजपा यांनी युतीत निवडणूक लढविली पण आम्हाला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलेला असताना तो पाळला नाही, असे कारण देत शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसह जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. अडीच वर्षांनी हे सरकार कोसळले. एकनाथ शिंदे आणि ४० आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर ३० जून रोजी उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,950चाहतेआवड दर्शवा
1,976अनुयायीअनुकरण करा
52,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा