26 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरराजकारणऋतुजा लटकेंचा विजय, नोटाचीही चर्चा

ऋतुजा लटकेंचा विजय, नोटाचीही चर्चा

नोटा पर्यायाला १२ हजार ७७६ मतं मिळाली आहेत.

Google News Follow

Related

राज्यात काही दिवसांपासून राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेली अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार आणि दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. मात्र त्यांच्या विजयापेक्षा राजकीय वर्तुळात नोटाचीच चर्चा अधिक रंगली होती. ऋतुजा लटके यांना ६६ हजार २४७ मतं मिळाली आहेत. तर नोटा पर्यायाला १२ हजार ७७६ मतं मिळाली आहेत. तसेच अपक्ष उमेदवार राजेश त्रिपाठी यांना एक हजार ५६९ मतं मिळाली आहेत.

आज, ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली होती. मतमोजणीच्या सतरा फेऱ्या पार पडल्या. प्रत्येक फेरीत ऋतुजा लटके या प्रथम क्रमांकावर तर नोटा हे दुसऱ्या स्थानी कायम राहिले. पंधाराव्या फेरीनंतर नोटा पर्यायाने चक्क १० हजार मतांचा टप्पा ओलांडला आहे. या फेरीतील मतमोजणीनंतर नोटाला १० हजार ९०६ मतं मिळाली. तर ऋतुजा लटके यांना ५५ हजार ९४६ मतं मिळाली आहेत.

विजयी झाल्यानंतर ऋतुजा लटके यांनी माध्यमांशी संवाद साधला. माझ्या पतीच्या कामगिरीमुळे विजयी झाले, असं ऋतुजा लटके यांनी सांगितले. हा विजय मविआच्या प्रत्येक नेत्याचा आहे. माझ्या पतीने केलेल्या कामाची पोचपावती मिळाली आहे, असं ऋतुजा लटके म्हणाल्या. तसेच विजय साजरा करण्यासाठी मातोश्रीवर जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. निवडणुकीत नोटा पर्यायालासुद्धा अधिक मतदान झाले. यावर ऋतुजा लटके यांनी म्हटले, नोटा लोकशाहीसाठी दिलेला पर्याय आहे. मतदारांनी नोटाला का मतदान दिले हे लोकांनाच विचारा, असं ऋतुजा लटके यांनी म्हटल.

हे ही वाचा:

‘उद्धव ठाकरेंनी केलेल्या बेईमानीचा बदला घेतला’

सोनाली फोगट हत्या प्रकरणात रेस्टॉरंटचा मालक अटकेत

दहशतवादी अबू हंजलाला अटक

‘तर उद्धव ठाकरेंनी महापौर बंगल्याची किंमत सरकारकडे जमा करावी’

दरम्यान, निवडणुकीमध्ये अवघे ३१.७४ टक्के इतके मतदान झाले होते. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व मतदारसंघात एकूण दोन लाख ७१ मतदार आहेत. मात्र, यापैकी फक्त ३१.७४ टक्के म्हणजे ८५ हजार ६९८ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
112,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा