25 C
Mumbai
Monday, January 17, 2022
घरराजकारण'म्हाडा' भरती परीक्षेत दलालांचा सुळसुळाट? आव्हाड म्हणतात...

‘म्हाडा’ भरती परीक्षेत दलालांचा सुळसुळाट? आव्हाड म्हणतात…

Related

राज्यातील म्हाडा भरतीची पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा हा सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. आज म्हणजेच रविवार, १२ डिसेंबर रोजी होऊ घातलेली ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा अतिशय नाट्यमयरित्या ११ डिसेंबरला रात्री करण्यात आली. तांत्रिक आणि अपरिहार्य कारणामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे सांगितले. पण या भरती परीक्षेमध्ये दलालांचा सुळसुळाट सुरु आहे का? असा सवाल सध्या उपस्थित होताना दिसत आहे. गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट त्याला कारणीभूत ठरत आहे.

भरती परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा करणाऱ्या ट्विट मध्येच आव्हाडांनी दलालांच्या विषयी भाष्य केले आहे. ते म्हणतात, “म्हाडाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो तुमचा अधिकार, तुमच्या बुद्धीचा सन्मान करत पैशाने तो मारला जाईल असं मी कधीच होऊ देणार नाही. माझ्याकडे आलेल्या तक्रारीमध्ये काही जणांनी आपली जमीन विकली आहे.आपल्या घरातले दागिने विकले आहेत. काही जणांनी कर्ज काढले आहेत. माझी या दलालांना नम्र विनंती आहे कि हे पैसे परत करा. कारण तुम्ही त्यांच काम करू शकणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही. पण असे ज्यांनी आपल्या आईचे मंगळसूत्र गहाण ठेवले आहे, आपली शेती गहाण ठेवली आहे असे पैसे घेऊन तुमची मूल-बाळ कधीच सुखी होऊ शकणार नाहीत.”

हे ही वाचा:

मुंबईत १४४ ‘कलम’; एमआयएमच्या सभेला गर्दी

‘म्हाडा’ ची भरती परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींचा संताप

‘ओबीसी आरक्षण संपवण्याचा ठाकरे सरकारच्या षडयंत्राचा डाव उघड’

…म्हणून पंतप्रधान मोदींचे ट्विटर खाते हॅक झाले?

यावरूनच संपूर्ण भरती परीक्षेच्या प्रकरणात काही मध्यस्थ, दलाल सक्रिय असून मोक्याच्या ठिकाणी विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यासाठी त्यांच्याकडून या दलालांनी मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्याचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे

दरम्यान या परीक्षेच्या संदर्भात पेपर फुटीच्याही घटना घडल्याचे पुढे आले आहे. पुण्यात ‘म्हाडा’ चा पेपर फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन इसमांना अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर पोलिसांनी ही कारवाई केली असून यात काही मोठे मासे गळाला लागल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,582अनुयायीअनुकरण करा
5,710सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा