30.1 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरराजकारण'संभाजी महाराजांना 'धर्मवीर' का म्हणू नये' याचे उत्तरच अजित पवारांनी दिले नाही

‘संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ का म्हणू नये’ याचे उत्तरच अजित पवारांनी दिले नाही

अजित पवारांनी पत्रकार परिषदेत दिली गोलमोल उत्तरे

Google News Follow

Related

हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीमहाराजांबद्दल केलेल्या विधानानंतर त्यांची चांगलीच कोंडी झाली. मात्र गेले दोन दिवस गप्प असलेले अजित पवार बुधवारी पत्रकार परिषदेत बोलले. पण त्यातून त्यांना नेमके काय म्हणायचे आहे याचा काहीही उलगडा झाला नाही. मी चुकलेलो नाही, मी वादग्रस्त विधान केलेले नाही, मी शरद पवारांच्या मताशी सहमत आहे, अशी गोलमोल उत्तरे देऊन ही पत्रकार परिषद संपली.

अजित पवार म्हणाले की, गंमत वाटते की, मी महाराजांबद्दल बोलत असताना कुठल्याही चुकीचे बोललेलो नाही. महामोर्चा काढला त्यात राज्यपाल महोदयांनी राष्ट्रपुरुषांचा अपमान केला होता. बेताल वक्तव्य केले होते. शब्द वापरायला नको होते ते वापरले. एक कळत नाही. भाजपाने आदेश दिले अजित पवारांना राजीनाम्याची मागणी करा. राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपद दिले आहे. भाजपाने दिलेले नाही.

अजित पवार म्हणाले की, भारतीय संविधान प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यासंदर्भात व्यक्तिस्वातंत्र्य आहे. मी बोलत असताना पवार साहेबांची माहिती मिळाली. स्वराज्यरक्षक म्हणावे अशी भूमिका आहे त्यांची  कुणी धर्मवीर म्हणत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असे शरद पवार म्हणाले होते. त्यांच्या मताशी मी सहमत आहे. असा मी कुठला गुन्हा केलाय, चुकीचं बोललो, ज्यातून महाराजांबद्दल अपशब्द निघाला? जे महापुरुषांचा अपमान करताहेत त्यांनीही सांगावं.

छत्रपती संभाजीमहाराजांचे वढू येथे स्मारक उभारण्याबाबत आम्ही महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला होता, असेही अजित पवार म्हणाले. त्यावेळी संभाजी महाराजांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असा होता, हे त्यांनी दाखविण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या अधिवेशनातील भाषणात संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणू नका असे जे आवाहन त्यानी केले होते, त्याचे उत्तर मात्र ते पत्रकार परिषदेत देऊ शकले नाहीत.

अजित पवार यांनी संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी किती निधी मिळणार आहे, त्याअंतर्गत शौर्य पुरस्कार सुरू करण्याबाबत कसा आम्ही निर्णय घेतला, याबद्दल त्यांनी सांगितले. पण हे सगळे सांगत असताना ते मूळ मुद्द्यावर काहीही करून आले नाहीत. संभाजी महाराजांना धर्मवीर का म्हणू नये याचे स्पष्टीकरण मात्र त्यांना देता आले नाही. वीज वितरण कामगारांचा संप, धनंजय मुंडे यांना झालेला अपघात याविषयावर मात्र त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.

मला सांगायचे आहे की जनतेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्प सादर केला होता. पहिल्याच पानावर सन्मा. अध्यक्ष महोदय २०२२ स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा स्मृतीदिन. तुळापूर स्मारक उभारण्याचे ठरविले आङे. मविआ २५० कोटींचा निधी देणार शौर्य, धाडस दाखविणाऱ्या नागरिकांसाठी छत्रपती संभाजीमहाराज शौर्य पुरस्कार योजना करण्यात येणार आहे. २०२२-२३ तिसरा अर्थ संकल्प सादर करतो आहे.

हे ही वाचा:

जितेंद्र आव्हाड आपली सर्वस्वी श्रद्धा औरंगजेबावर आहे!

सोमालियामध्ये दोन कारमध्ये स्फोट, ९ ठार

सिंधुताई सपकाळ अनाथांची माय

रितेशच्या चित्रपटाने प्रेक्षकांना लावले “वेड”

अजित दादा म्हणाले की, मी जी भूमिका अधिवेशनात मांडली, त्या भूमिकेवर मी ठाम आहे. इतिहासाचं आकलन झालं आहे त्याप्रमाणे मी भूमिका मांडली आहे. मी इतिहासतज्ज्ञ नाही. इतिहासाचा संशोधक नाही. त्यामुळे त्याबाबत युक्तिवाद मी करणार नाही. तो विषय इतिहास संशोधकांचा आहे. यापुढे त्यावर चर्चा करून राजकीय हेतूने वातावरण तापवणे कदापिही मला मान्य नाही.

अजित पवार असेही म्हणाले की, स्वराज्यरक्षणात स्वराज्यनिर्मिती, संस्कृती, समाज, धर्म यांचे रक्षण येते. धर्मवीर म्हणणे म्हणजे राज्य संरक्षणाच्या कामाला मदत होते, असे नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,911चाहतेआवड दर्शवा
2,002अनुयायीअनुकरण करा
61,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा