25 C
Mumbai
Thursday, March 23, 2023
घरदेश दुनियारितेशच्या चित्रपटाने प्रेक्षकांना लावले "वेड"

रितेशच्या चित्रपटाने प्रेक्षकांना लावले “वेड”

वेड चित्रपटाची अवघ्या पाच दिवसात कोटी कोटी कमाई

Google News Follow

Related

मराठी चित्रपट वेडने त्याची विजयी दौड सुरू ठेवली आहे. रिलीज नंतर अवघ्या पाचव्या दिवशी अपवादात्मकरित्या चांगला गल्ला या चित्रपटाने मिळवला आहे.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांचा चित्रपट वेड हा लोकांच्या पसंतीस उतरल्याचे प्रारंभिक चित्र तरी दिसते आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या पाच दिवसांत एकूण १५.६७  कोटी रुपये कमवले आहेत.

वेड चित्रपटाबद्दल 

अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित, वेदमध्ये रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख आणि जिया शंकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २०१९ च्या तेलुगू चित्रपट माजिलीपासून प्रेरित होऊन हा चित्रपट ३० डिसेंबर २०२२ रोजी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आला. रितेशचे दिग्दर्शनातील पदार्पणा व्यतिरिक्त, हा चित्रपट रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलियाचा पहिलाच मराठी चित्रपट आहे.

हे ही वाचा:

अजित पवार माफी मागा, नाहीतर महाराष्ट्रात फिरू देणार नाही

अमेय घोले उद्धव गटाकडून शिंदे गटाच्या वाटेवर?

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताय मग हे वाचाच!

‘विज्ञानामुळे महिलांचे सशक्तीकरण आणि महिलांमुळे विज्ञान सशक्त होते’

त्याच्या दिग्दर्शनाच्या पदार्पणाबद्दल बोलताना रितेश म्हणाला, “२० वर्षे कॅमेऱ्यासमोर राहिल्यानंतर, मी पहिल्यांदाच त्याच्या मागे उभा राहण्यासाठी मोठी झेप घेतली आहे. माझा पहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित करत असताना, मी नम्रपणे तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मागतो. या प्रवासाचा एक भाग व्हा, या वेडाचा एक भाग व्हा. असे रितेशने म्हंटले आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत स्थिरावलेल्या रितेश देशमुखने प्रथमच या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. त्यामुळे त्याच्या या चित्रपटाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,882चाहतेआवड दर्शवा
2,029अनुयायीअनुकरण करा
65,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा