26 C
Mumbai
Thursday, December 9, 2021
घरक्राईमनामाअखेर अनिल देशमुख ईडीसमोर हजर

अखेर अनिल देशमुख ईडीसमोर हजर

Related

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज मुंबईतील ईडीच्या कार्यालयात त्यांच्याविरुद्धच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी दाखल झाले. अनिल देशमुख बेपत्ता असल्याच्या बातम्यांनंतर आणि अनिल देशमुख यांच्यावर ‘भगौडा’ असा आरोप करण्यात आल्यानंतर आता अनेक दिवसांनी अनिल देशमुख चौकशीसमोर सादर झाले आहेत.

१०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांमुळे या वर्षाच्या सुरुवातीला राजीनामा द्यायला लागलेले देशमुख हे अनेक दिवस बेपत्ता होते. शुक्रवारी मुंबई उच्च यायालयाने त्यांच्या विरुद्धचे समन्स रद्द करण्यासाठी नकार दिल्यानंतर आज, सोमवारी त्यांनी ‘आत्मसमर्पण’ केलं आहे.

आज एका व्हिडिओ निवेदनात ते म्हणाले “माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. जेव्हा मला ईडीकडून समन्स मिळाले, तेव्हा माझ्यावर तपास यंत्रणेला सहकार्य न केल्याचा आरोप करण्यात आला. पण मला हे स्पष्ट करायचे आहे की, जेव्हा जेव्हा मला हजर राहण्यास सांगितले गेले तेव्हा मी एजन्सीला सांगितले की, हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. मी त्यांना असेही सांगितले की मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि लवकरच सुनावणी सुरू होणार आहे.” देशमुख म्हणाले होते की पोलीस प्रमुखांच्या अंतर्गत मुकेश अंबानी सुरक्षेच्या चौकशीत काही “अक्षम्य” त्रुटी उघड झाल्या आहेत.

जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी आरोप फेटाळून लावले आणि लाचखोरीच्या दाव्यांवर मानहानीचा खटला भरण्याची धमकी दिली असली तरी, देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलेलेच आहे.

हे ही वाचा:

जी-२० परिषदेत मोदींनी हवामान, शेती विषयाची केली यशस्वी मांडणी

गोवत्सद्वादशी… दिवाळीचा पहिला दिवस!

नवाब मलिकांनी लवंगी लावला, मी दिवाळी नंतर बॉम्ब फोडेन

कारवां ‘शालिमार’ चा

आता, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त देखील बेपत्ता आहेत. त्यांच्या विरोधातही लुकआउट नोटीस आधीच जारी करण्यात आली आहे. त्याच्यावर खंडणीचे आरोप असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,516अनुयायीअनुकरण करा
4,940सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा