33 C
Mumbai
Saturday, November 27, 2021
घरराजकारणनवाब मलिकांनी लवंगी लावला, मी दिवाळी नंतर बॉम्ब फोडेन

नवाब मलिकांनी लवंगी लावला, मी दिवाळी नंतर बॉम्ब फोडेन

Related

दिवाळीच्या आधी लवंगी फटाका लावून खूप मोठा आवाज झाल्याचा आव नवाब मलिक आणतायंत असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर त्यांनी लवंगी लावून सुरूवात केली आहे. पण दिवाळी नंतर बाॅम्ब मी फोडेन असे देखील फडणवीस यांनी सांगीतले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचा फोटो ट्विट करत भाजपाचे ड्रग्स कनेक्शन असे म्हटले होते. यावरूनच फडणवीस आक्रमक झाले असून त्यांनी नवाब मलिकांवर पलटवार केला आहे.

एनसीबीने अटक केलेल्या जयदीप राणा नामक एका ड्रग्स पेडलरचा अमृता फडणवीस यांच्यासोबतचा फोटो नवाब मलिक यांनी ट्विट केला होता. यावेळी ‘आज भाजपा आणि ड्रग्स पेडलर यांच्या कनेक्शनची चर्चा करूया’ असे मलिक म्हणाले होते. मलिक यांनी पोस्ट केलेल्या फोटोतील जयदीप राणा हा इसम अमृता फडणवीस यांनी गायलेल्या रिव्हर अँथेम गाण्याच्या प्रोजेक्टचा एक भाग होता. पण यावर रिव्हर मार्च या सामाजिक संस्थेने खुलासा केला असून आम्ही त्याला आमच्या प्रकल्पासाठी हायर केल्याचे म्हटले आहे. नदी बचावासाठी कार्य करणाऱ्या या संस्थेच्या रिव्हर अँथेम या प्रकल्पात देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस यांनी जनजागृतीसाठी सहभाग नोंदवला होता. या वेळी संपूर्ण चमूने त्यांच्यासोबत फोटो काढले होते. या व्यतिरिक्त त्या व्यक्तीशी फडणवीस दाम्पत्याचा कोणताही संबंध आला नाही.

हे ही वाचा:

गोवत्सद्वादशी… दिवाळीचा पहिला दिवस!

जी-२० परिषदेत मोदींनी हवामान, शेती विषयाची केली यशस्वी मांडणी

‘मोदींवर टीका करण्याची तुमची लायकी आहे का?’

…आता दिल्लीतील महाविद्यालयांना वीर सावरकर आणि सुषमा स्वराज यांचे नाव

पण हा एकमाव फोटो ट्विट करत नवाब मलिकांनी भाजपावर आरोपांच्या फैरी झाडल्या. पण देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत या अरोपांमधील हवाच काढून टाकली आहे. नवाब मलिक यांनी दिवाळी आधी लवंगी लवली आहे. मी दिवाळी नंतर बॉम्ब फोडेन असे फडणवीस यांनी म्हटले आहे. तर मी काचेच्या घरात रहात नाही. अंडरवर्ल्ड सोबत ज्यांचे कनेक्शन आहेत त्यांनी माझ्यावर आरोप करू नयेत असा हल्लाबोलही फडणवीस यांनी केला आहे. यावेळी नवाब मलिक यांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनचे सर्व पुरावे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पाठवणार असल्याचेही फडणवीसांनी सांगितले.

…तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ड्रग माफियांचा म्हणावा लागेल

रिव्हर अँथेमच्या निमित्ताने माझ्यासोबत आणि माझ्या पत्नीसोबत काढलेला एकमेव फोटो ट्विट करत नवाब मलिक याला भाजापाचे ड्रग्स कनेक्शन म्हणतात. जो फोटो चार वर्षांपूर्वीचा आहे. या इसमाला एनसीबीने चार वर्षांनंतर अटक केली आहे. पण तरी जर याला भाजपाचे ड्रग्स कनेक्शन म्हणत असतील तर नवाब मलिक यांचा जावई तर ड्रग्स सोबत सापडला आहे. मग या हिशोबात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ड्रग्स माफियांचा पक्ष म्हणायचे का? असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,506अनुयायीअनुकरण करा
4,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा