29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरक्राईमनामाअनिल देशमुखांचे खासगी सचिव ईडीच्या ताब्यात

अनिल देशमुखांचे खासगी सचिव ईडीच्या ताब्यात

Google News Follow

Related

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची छापेमारी सुरु आहे. दुसरीकडे देशमुख यांच्या मुंबईतील सुखदा या निवासस्थानी ही ईडीची एक टीम सकाळपासून आहे. थोड्याच वेळापुर्वी अनिल देशमुख सुद्धा निवासस्थानी दाखल झाले आहे. या सगळ्यात अत्यंत महत्वाची बाब म्हणजे अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजिव पालांडे यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. पालांडे यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी घेऊन जाण्यात आलं आहे. दुसरीकडे देशमुख यांच्या कुटुंबियांचे फोन रेकॉर्डिंग तपासले जात असल्याची माहिती मिळत आहे.

अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सकाळी साडे सात वाजेपासून देशमुखांच्या ज्ञानेश्वरी आणि सुखदा या निवासस्थानी छापेमारी सुरु आहे. त्यानंतर अनिल देशमुख दुपारी साडे बाराच्या सुमारास सुखदा बंगल्यावर दाखल झालं आहे. दुसरीकडे देशमुख यांचे खासगी सचिव संजिव पालांडे यांनाही ईडीने ताब्यात घेत चौकशीला सुरुवात केली आहे. पालांडे यांच्या चौकशीतून काही बाहेर येतं का, हे पाहणंही महत्वाचं आहे. ईडीने काही लोकांचे जबाबही नोंदवल्याची माहिती मिळतेय. त्यात डीसीपी राजीव भुजबळ आणि काही बार मालकांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

एकीकडे ईडीकडून अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी सकाळपासून छापेमारी सुरु आहे. तर दुसरीकडे ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील काही बार मालकांचेही जबाब नोंदवल्याचं कळतंय. सुमारे १० ते १२ बार मालकांचा जबाब ईडीने नोंदवला आहे. त्यात या बार मालकांनी मिळून काही महिने ४ कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिली आहे. त्याच अनुषंगाने आता ईडीची कारवाई सुरु असल्याचं कळंतय.

हे ही वाचा:

मुंबई-ठाण्यातल्या बनावट लसीकरणाचा पर्दाफाश

शिवसेना म्हणजे ‘बेकायदेशीर बंगलो’ सेना

स्पुतनिक वी लस पुण्यात दाखल

राज्यात अनेक मराठा मुख्यमंत्री होऊन सुद्धा मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही कारण…

दरम्यान, सीबीआयने २१ एप्रिल रोजी अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह १० ठिकाणी छापे मारले होते. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याची माहिती मिळत आहे. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा