32 C
Mumbai
Monday, June 21, 2021
घर राजकारण ‘तो’ ६५०० कोटींचा चेक विद्यार्थ्यांच्या फीसाठी वापरा!

‘तो’ ६५०० कोटींचा चेक विद्यार्थ्यांच्या फीसाठी वापरा!

Related

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरणाची घोषणा सोमवारी केली. मात्र त्यामुळे आता महाराष्ट्रावरचा आर्थिक भार हलका झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसींच्या खरेदीसाठी एकरकमी चेक देण्याची तयारी दर्शविली होती, तो ६५०० कोटींचा धनादेश विद्यार्थ्यांच्या शालेय शुल्कासाठी वापरावा, अशी मागणी भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने लसींची खरेदी करण्यासाठी एकरकमी पैसे देण्याची तयारी दर्शविली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हमध्ये तशी घोषणा केली होती. मात्र आता पंतप्रधानांनी लसीकरण केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्याचे ठरविल्यामुळे ठाकरे सरकारचे पैसे वाचले आहेत. ते त्यांनी या विद्यार्थ्यांसाठी वापरावेत असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

मोदींच्या घोषणेने ग्लोबल टेंडरची हवाच काढली

ठाकरे सरकारकडून पीक विम्याबाबत शेतकऱ्यांची फसवणूक

केमिकल कंपनीत काल आग, तर आज गोडाऊनने पेट घेतला

हाफकिनशी करार झाला; लस पुरविण्यास लागणार आणखी एक वर्ष

ते म्हणतात, पंतप्रधानांनी आपल्या भाषणात १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी मोफत लसीकरण करणार असल्याचे जाहीर केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते की, ६५०० कोटींचा चेक तयार आहे. मात्र आपण हे काम करू शकला नाहीत. आता हे पैसे कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांची फी माफ करण्याकरिता वापरा. केंद्राने तुमचे पैसे वाचवले आहे. आता ही मागणी तातडीने २४ तासांत पूर्ण करा. नाहीतर भाजपा यासंदर्भात आंदोलन करेल.

पंतप्रधानांनी ही घोषणा करण्यापूर्वी राज्य सरकारांनी लसींच्या खरेदी आणि वितरणाची जबाबदारी आमच्यावर सोपवा, अशी मागणी केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने ती जबाबदारी राज्यांकडे सोपविली होती. पण राज्यांना हे शिवधनुष्य पेलता आले नाही.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा