25 C
Mumbai
Thursday, February 9, 2023
घरराजकारणछपरा विषारी दारु दुर्घटनेतील मृतांची संख्या ५० वर

छपरा विषारी दारु दुर्घटनेतील मृतांची संख्या ५० वर

राज्यसभेतही दुर्घटनेचे पडसाद

Google News Follow

Related

बिहारमधील छपरा येथील विषारी दारु दुर्घटनेतील मृतांची संख्या ५० वर पोहोचली आहे. त्यातच सारण जिल्ह्यात बनावट दारू पिऊन आणखी ११ जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये नितीश कुमार सरकारने एप्रिल २०१६ पासून दारू विक्री आणि सेवनावर बंदी घातली आहे . परंतु बुधवार आणि गुरुवारी विषारी दारूमुळे सर्वाधिक मृत्यू झाल्यामुळे राज्यात खळबळ माजली आहे. राज्यसभेतही या दुर्घटनेचे पडसाद उमटले.

छपरा येथे विषारी दारू प्रकरणात मृत्यूची नोंद झाल्यानंतर बुधवारी विरोधकांनी राज्य विधानसभेत बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला होता. गुरुवारी देखील विरोधकांनी हाच प्रमुख मुद्दा राज्यसभेत उचलून धरला होता .त्यामुळे ४० मिनिटांच्या अल्प कालावधीत सभागृहाचे कामकाज तीनदा तहकूब करावे लागले विरोधी पक्षांनी शून्य प्रहरामध्ये त्यांचे मुद्दे एकत्रितपणे उपस्थित केले.

मरहौरा उपविभागीय पोलीस अधिकारी योगेंद्र कुमार यांच्या शिफारसीनुसार मंगळवारी रात्रीच्या दुर्घटनेनंतर मसरख स्टेशन हाऊस ऑफिसर रितेश मिश्रा आणि कॉन्स्टेबल विकेश तिवारी यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. नितीश कुमार यांचा माजी मित्रपक्ष भाजपने त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले असून राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी गुरुवारी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांना छपरा दुर्घटनेबाबत प्रश्न विचारला. त्यावर जर कोणी दारू प्यायली तर ते मरतील”, जे इतरांसह पीडित कुटुंबांसाठी चांगले झाले नाही असे अजब उत्तर नितीशकुमार यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.

हे ही वाचा : 

संजय राऊत म्हणातात, आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला

हत्या झालेली वीणा कपूर आणि जिवंत वीणा कपूर यामुळे उडाला गोंधळ

नेमाडपंथी पुरोगामी अज्ञानपीठ

समृद्धी महामार्गावर नागपूर-शिर्डी, नागपूर-औरंगाबाद एसटी सेवा सुरू

“दारू बंदीचा अनेकांना फायदा झाला आहे. मोठ्या संख्येने लोकांनी दारू सोडली आहे…हे चांगले आहे. अनेकांनी हे आनंदाने स्वीकारले आहे. पण तरीही काही त्रासदायक आहेत. खर्‍या त्रासदायकांची ओळख पटवून त्यांना पाकसुन देण्यास अधिकाऱ्यांना सांगितले असल्याचे सांगितले आहे,” असे नितीश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. बिहारचे उत्पादन शुल्क मंत्री सुनील कुमार यांनीही या मृत्यूला जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. “एफआयआर भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मी एसपीशी फोनवर बोललो आहे,” सुनील कुमार यांनी बुधवारी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,906चाहतेआवड दर्शवा
2,003अनुयायीअनुकरण करा
61,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा